Prajakta Mali : तू तशी कशी दिसशील, नको ना असे काम करूस...! प्राजक्ताचं ‘बकासन’ अन् चाहत्यांच्या कमेंट्स!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 06:26 PM2022-10-21T18:26:29+5:302022-10-21T18:26:57+5:30

Prajakta Mali : या व्हिडीओत प्राजक्ता बकासन करताना दिसतेय. पण खास बात काय तर या व्हिडीओवरच्या कमेंट्स. चाहत्यांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

marathi actress Prajakta Mali share yoga video got troll | Prajakta Mali : तू तशी कशी दिसशील, नको ना असे काम करूस...! प्राजक्ताचं ‘बकासन’ अन् चाहत्यांच्या कमेंट्स!!

Prajakta Mali : तू तशी कशी दिसशील, नको ना असे काम करूस...! प्राजक्ताचं ‘बकासन’ अन् चाहत्यांच्या कमेंट्स!!

googlenewsNext

 Prajakta Mali Yoga Video, Bakasan : सालस, सोज्वळ सून म्हणून झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali )  हिचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. होय, प्राजक्ताने योगासन करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता बकासन करताना दिसतेय. पण खास बात काय तर या व्हिडीओवरच्या कमेंट्स. चाहत्यांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी तिला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.
‘याआधीही हे आसन करताना तुम्ही मला पाहिलंय पण 12 काऊंट आसन होल्ड करणं आत्ता जमायला लागलं...,’असं कॅप्शन देत प्राजक्ताने आसन करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओवर नेहमीप्रमाणे चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ‘फरसाण खायचा... मग काय उपयोग योगाचा....’अशी मजेशीर कमेंट एका युजरने केली आहे. दात पडलेली कशी दिसेल प्राजू? तू नको ना असे काम करू.... अशी आणखी एक भन्नाट कमेंट एका चाहत्याने केली आहे. बकाबका खाऊन झाल्यावर बकासन करावे, अशी कमेंटही या व्हिडीओवर वाचायला मिळतेय. प्राजू, तू फक्त आता हवेत उडायचं बाकी आहे. तेवढं करून टाक म्हणजे सगळे योगासन पूर्ण..., असंही एका चाहत्याने म्हटलं आहे.

 प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कॉमेडी शो होस्ट करताना दिसते. अनेकदा शोमधील कलाकार प्राजक्ताची सेटवर फिरकी घेताना दिसतात. सोशल मीडियावरही प्राजक्तावरचे मीम्स व्हायरल होताना दिसतात. प्राजक्ता स्वत:वरचे हे सगळे विनोद खिलाडूवृत्तीनं स्वीकारते. प्रत्येकाला खळखळून हसत दाद देते.   प्राजक्ताने नुकतेच एका आगामी मराठी चित्रपटाचं शूटिंग केले आहे. त्यासाठी ती लंडनला गेली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्ववादी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता ऋषिकेश जोशी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.
    

Web Title: marathi actress Prajakta Mali share yoga video got troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.