बालपणीच्या आठवणीत प्राजक्ता रममाण; कुटुंबासोबत रचला लगोरीचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 05:54 PM2022-08-17T17:54:36+5:302022-08-17T17:54:57+5:30

Prajakta mali: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये प्राजक्ता तिच्या कुटुंबियांसोबत लगोरी खेळताना दिसून येत आहे.

marathi actress Prajakta mali childhood memories see video | बालपणीच्या आठवणीत प्राजक्ता रममाण; कुटुंबासोबत रचला लगोरीचा डाव

बालपणीच्या आठवणीत प्राजक्ता रममाण; कुटुंबासोबत रचला लगोरीचा डाव

googlenewsNext

उत्तम अभिनय आणि स्वभावातील साधेपणा यांच्या जोरावर लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (prajakta mali). अलिकडेच प्राजक्ताची मुख्य भूमिका असलेली 'रानबाजार' (RaanBaazaar)  ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्राजक्ताचा कधी न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना अनुभवता आला. या सीरिजमुळे प्राजक्ताला नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाली. मात्र, तेव्हापासून ती सातत्याने चर्चेत येत आहे. सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली प्राजक्ता सध्या तिच्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवत आहे. त्यामुळे या शॉर्ट ब्रेकमधील अनेक फोटो, व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यामध्येच सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये तिने तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिल्याचं पाहायला मिळत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये प्राजक्ता तिच्या कुटुंबियांसोबत लगोरी खेळताना दिसून येत आहे. ज्यावेळी त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र येतं त्यावेळी त्यांच्यामध्ये लगोरीचा डाव नक्की रंगतो असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

"लगोरी ..आमच्या कुटूंबाचा हा आवडतां खेळ झालाय…भर पावसात ३-३ तास वेड्यासारखे खेळलो.. (अजूनही अंग दुखतंय..)पण हरकत नाही, माती-गवतावर खेळल्यानं माझी skeen जास्त glow करतेय…(असो, तुसती लुडबूडची {याज्ञा} पळापळ miss करू नका," असं कॅप्शन प्राजक्ताने या पोस्टला दिलं आहे. या व्हिडीओसोबत तिने काही फोटोही शेअर केले आहेत.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये कुटुंबासोबत असताना प्राजक्ता प्रचंड आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच या लगोरीच्या खेळामध्ये कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने सहभाग घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
 

Web Title: marathi actress Prajakta mali childhood memories see video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.