लाजरान साजरा मुखडा..! मराठमोळ्या अभिनेत्रीचे साडीतील फोटो पाहून पडाल प्रेमात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 07:00 IST2020-04-28T07:00:00+5:302020-04-28T07:00:00+5:30

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील फोटोंना मिळतेय खूप पसंती

Marathi Actress Pooja Sawant shared photos in saree, See her photo TJL | लाजरान साजरा मुखडा..! मराठमोळ्या अभिनेत्रीचे साडीतील फोटो पाहून पडाल प्रेमात 

लाजरान साजरा मुखडा..! मराठमोळ्या अभिनेत्रीचे साडीतील फोटो पाहून पडाल प्रेमात 

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. क्षणभर विश्रांती या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आतापर्यंत तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत आणि सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली. 

पूजाने अक्षय तृतीयाच्या दिवशी साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने निळ्या रंगाची काठपदरी साडी नेसली आहे. त्यावर गळ्यात हिऱ्यांचा नेकलेस व मोकळ्या केसात तिचे सौंदर्य खुललं आहे.

पूजाच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. 

पूजा सावंत सोशल मीडिया सक्रीय असून नेहमी ती फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. तसेच आपल्या आगामी प्रोजेक्टबदलची माहिती ही पूजा तिच्या फॅन्सना देत असते.

पूजाने 'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. यानंतर 'आता गं बया', 'झकास', 'सतरंगी रे', 'दगडी चाळ', 'नीळकंठ मास्तर' अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता मराठी रसिकांची मनं जिकंल्यानंतर तिने जंगली सिनेमातून बॉलिवूडमध्येही एंट्री केली.

Web Title: Marathi Actress Pooja Sawant shared photos in saree, See her photo TJL