हळद लागली, उद्या पडणार अक्षता; चव्हाणांच्या घरची सून होणार पूजा सावंत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 11:44 AM2024-02-27T11:44:22+5:302024-02-27T11:45:47+5:30

पूजा सावंतने काही दिवसांपूर्वीच तिच्या सिद्धेश चव्हणासोबत फोटो शेअर करत तिच्या आयुष्यातील मिस्ट्री मॅनचा खुलासा केला होता.

marathi actress Pooja Sawant getting married tomorrow with Siddhesh Chavhan | हळद लागली, उद्या पडणार अक्षता; चव्हाणांच्या घरची सून होणार पूजा सावंत!

हळद लागली, उद्या पडणार अक्षता; चव्हाणांच्या घरची सून होणार पूजा सावंत!

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नसमारंभांना उधाण आलं आहे. पूजा सावंत (Pooja Sawant) लग्नबंधनात अडकणार आहे. सिद्धेश चव्हाणची (Siddhesh Chavhan) ती नवरी होण्यासाठी सज्ज आहे. कालच पूजा आणि सिद्धेशच्या संगीत सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर आता तिच्या हळदीचा व्हिडिओही समोर आला आहे. उद्या पूजा आणि सिद्धेशच्या डोक्यावर अक्षता पडणार आहेत.

पूजा सावंतने काही दिवसांपूर्वीच तिच्या सिद्धेश चव्हणासोबत फोटो शेअर करत तिच्या आयुष्यातील मिस्ट्री मॅनचा खुलासा केला होता. तर आता काहीच दिवसात तिने साखरपुडाही केला आणि लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. पूजाच्या साखरपुड्याला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. तिचा जवळचा मित्र भूषण प्रधान, भार्गवी चिरमुले, प्रार्थना बेहेरे ही देखील नवऱ्यासह आली होती. परवा सगळ्यांनी मिळून संगीत समारंभही एन्जॉय केला. पूजा-सिद्धेशच्या डान्सने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. तर कालच पूजाला हळद लागली. जांभळ्या रंगाची साडी,  हिरव्या बांगड्या, कानात मोठे झुमके, केसात गजरा या लूकमध्ये ती खूपच खास दिसत होती. तिच्या हळदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

काल हळद पार पडल्यानंतर उद्या म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी पूजा आणि सिद्धेश मुंबईतच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी हजर असणार आहेत. थाटामाटात अतिशय ग्रँड पद्धतीने हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. चाहत्यांना पूजाला नवरीच्या वेशात बघण्याची उत्सुकता आहे. पूजाचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण हा कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला असतो. लग्नानंतर पूजा काही काळासाठी ऑस्ट्रेलियाला शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा आहेत. 

Web Title: marathi actress Pooja Sawant getting married tomorrow with Siddhesh Chavhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.