मन धागा धागा जोडते नवा! पूजा सावंतने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 08:45 IST2024-02-17T08:44:07+5:302024-02-17T08:45:07+5:30

पूजा सावंतची लगीनघाई! सिद्धेशबरोबर पार पडला साखरपुडा, फोटो व्हायरल

marathi actress pooja sawant enagagement with siddhesh chavan photos viral | मन धागा धागा जोडते नवा! पूजा सावंतने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर

मन धागा धागा जोडते नवा! पूजा सावंतने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर

मराठी कलाविश्वात सध्या सनई चौघडे वाजत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. नुकताच लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परबचा साखरपुडा पार पडला. आता प्रथमेश पाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंतनेही साखरपुडा केला आहे. पूजा आणि सिद्धेशचा साखरपुडा झाला आहे. याचे काही फोटो समोर आलं आहेत. 

पूजा सावंतने साखरपुड्यासाठी खास हिरव्या रंगाची साडी नेसली होती. नाकात नथ घालत तिने पारंपरिक लूक केला होता. तर सिद्धेशने कुर्ता पायजमा परिधान केला होता. त्यानंतर रिसेप्शनसाठी पूजा आणि सिद्धेश हटके लूकमध्ये दिसून आले. पूजाने डिझायनर लेहेंगा परिधान करत त्यावर मॅचिंग खड्यांची ज्वेलरी घातली होती. तर सूटमध्ये सिद्धेश राजबिंडा दिसत होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पूजाच्या साखरपुड्याला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनीही हजेरी लावली होती. प्रार्थना बेहेरे, फुलवा खामकर, भूषण प्रधान, वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी हे कलाकार उपस्थित होते. 

पूजाच्या होणाऱ्या पतीचं नाव सिद्धेश चव्हाण असं आहे. आता साखरपुड्यानंतर पूजा आणि सिद्धेश लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच पूजाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. सिद्धेशचा कलाविश्वाशी संबंध नसून तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला असतो. 

Web Title: marathi actress pooja sawant enagagement with siddhesh chavan photos viral