आपली यारी..! पूजा-सिद्धेशच्या साखरपुड्यात मित्रांची हवा; प्रार्थनाने शेअर केले Unseen photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 12:59 IST2024-02-18T12:57:41+5:302024-02-18T12:59:01+5:30

Prarthana behere: पूजा-सिद्धेशच्या साखरपुड्याला कलाकार मंडळींनी चांगलीच मज्जामस्ती केल्याचं दिसून येत आहे.

marathi-actress-pooja-sawant- and-siddhesh-chavan-enagagement unseen photos share by Prarthana behere | आपली यारी..! पूजा-सिद्धेशच्या साखरपुड्यात मित्रांची हवा; प्रार्थनाने शेअर केले Unseen photos

आपली यारी..! पूजा-सिद्धेशच्या साखरपुड्यात मित्रांची हवा; प्रार्थनाने शेअर केले Unseen photos

सध्या सोशल मीडियावर आणि कलाविश्वात अभिनेत्री पूजा सावंत (pooja sawant) हिच्याच नावाची चर्चा आहे. मराठी कलाविश्वातील या कलरफूलने नुकतीच एंगेजमेंट केली आहे. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पूजाने सिद्धेश चव्हाण (siddhesh chavan) याच्यासोबत साखरपुडा केला. या साखरपुडा सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्येच आता अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने या कार्यक्रमातील काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रार्थनाने (Prarthana behere) नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने पूजा-सिद्धांतच्या साखरपुड्याचे काही अनसीन फोटो कोलाज केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेता भूषण प्रधान, वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी आणि त्याची पत्नी दिसून येत आहेत.

दरम्यान, प्रार्थना आणि पूजा एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पूजा आणि सिद्धेश यांच्या साखरपुड्याची नेटकरी कधीपासून वाट पाहात होते. अखेर या जोडीने मोठ्या धुमधडक्यात एंगेजमेंट केली. यावेळी प्रार्थनाने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तर, सिद्धेश कुर्ता-पायजमा परिधान केला होता.

साखरपुड्याच्या रिसेप्शनसाठी पूजा-सिद्धेशने डिझायनर कपडे परिधान केले होते. यावेळी पूजाने पांढऱ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान करत त्यावर मॅचिंग खड्यांची ज्वेलरी घातली होती. तर सिद्धेशने देखील पांढऱ्या रंगाचा सूट घातला होता.

Web Title: marathi-actress-pooja-sawant- and-siddhesh-chavan-enagagement unseen photos share by Prarthana behere