या मराठी अभिनेत्रीचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पाहून विसराल बॉलिवूडच्या अभिनेत्रींना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 12:44 IST2020-01-24T12:41:56+5:302020-01-24T12:44:44+5:30

या अभिनेत्रीने हॉट अंदाजात नुकतेच फोटोशूट केले असून या फोटोसोबतच उडे दिल बेफिक्रे असे कॅप्शन देखील लिहिले आहे.

Marathi Actress Pallavi Patil bold and glamorous photo shoot | या मराठी अभिनेत्रीचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पाहून विसराल बॉलिवूडच्या अभिनेत्रींना

या मराठी अभिनेत्रीचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पाहून विसराल बॉलिवूडच्या अभिनेत्रींना

ठळक मुद्देपल्लवी पाटीलने हॉट अंदाजात नुकतेच फोटोशूट केले असून या फोटोसोबतच उडे दिल बेफिक्रे असे कॅप्शन देखील लिहिले आहे. या फोटोतील तिचा अंदाज तिच्या चाहत्यांना आवडत असून हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री पल्लवी पाटील सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससाठी शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. तिने पोस्ट केलेल्या बोल्ड फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तिच्या या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंवर तिचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

पल्लवी पाटीलने हॉट अंदाजात नुकतेच फोटोशूट केले असून या फोटोसोबतच उडे दिल बेफिक्रे असे कॅप्शन देखील लिहिले आहे. या फोटोतील तिचा अंदाज तिच्या चाहत्यांना आवडत असून हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या चाहत्यांकडून होत आहे.

पल्लवी पाटीलने बोल्ड अँड ग्लॅमरस फोटोशूट करण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. याआधी देखील तिने अनेकवेळा ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. यासोबतच भारतीय पेहरावातील देखील पल्लवीचे फोटो आपल्याला तिच्या इन्स्टाग्रामला पाहायला मिळतात. तिच्या या फोटोंना देखील तिच्या चाहत्यांची तितकीच पसंती मिळते. पल्लवीच्या या फोटोंमुळेच तिला तिचे फॅन्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फोलो करतात. 

'क्लासमेटस्’, 'शेंटीमेंटल', 'सविता दामोदर परांजपे', 'बॉइज-2', 'तू तिथे असावे' अशा सिनेमात पल्लवी पाटीलने खूपच चांगल्या भूमिका साकारल्या असून ‘गोंद्या आला रे’च्या माध्यमातून तिने काही महिन्यांपूर्वी वेबसीरिजच्या दुनियेतदेखील पदार्पण केले आहे. पल्लवी पाटीलने ‘गोंद्या आला रे’ वेबसीरिजमध्ये दामोदर चापेकरांची पत्नी ‘दुर्गाबाई चापेकर’ या शूर महिलेची भूमिका साकारली होती.

Web Title: Marathi Actress Pallavi Patil bold and glamorous photo shoot