या मराठी अभिनेत्रीने शेअर केला सेल्फी, काही तासातच झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 18:27 IST2020-04-23T18:18:47+5:302020-04-23T18:27:07+5:30

सेल्फीमधील तिचा अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे.

Marathi actress neha pendse share a selfie gda | या मराठी अभिनेत्रीने शेअर केला सेल्फी, काही तासातच झाला व्हायरल

या मराठी अभिनेत्रीने शेअर केला सेल्फी, काही तासातच झाला व्हायरल

मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. काही महिन्यापूर्वी  नेहाने लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर नेहा नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिच्या सोशल मीडिया पेजवर तुम्ही नजर टाकली तर नेहा आपल्या हॉट अंदाजातील फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल.


नेहाने नुकतेच  तिचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत नेहा खूपच सुंदर दिसते आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. सेल्फिमधील  नेहाचा हा अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे.


नेहा ही फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. तिच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर बराच काळ चर्चा होती. या व्हिडीओने तिच्या फॅन्सना आणि सोशल मीडियावर साऱ्यांनाच अक्षरक्षा वेड लावलं होतं. या व्हिडीओत ती वर्कआऊट करत असल्याचे पाहायला मिळत होते.

Web Title: Marathi actress neha pendse share a selfie gda