मृण्मयी देशपांडेचा स्ट्रॉबेरीचा मळा पाहिलात का? अभिनेत्रीने शेअर केला शेतातील व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 12:40 IST2024-01-09T12:39:24+5:302024-01-09T12:40:33+5:30

मृण्मयीने शेतात पिकवली स्ट्रॉबेरी, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

marathi actress mrunmayee deshpande shared video of harvesting strawberry of her own farm | मृण्मयी देशपांडेचा स्ट्रॉबेरीचा मळा पाहिलात का? अभिनेत्रीने शेअर केला शेतातील व्हिडिओ

मृण्मयी देशपांडेचा स्ट्रॉबेरीचा मळा पाहिलात का? अभिनेत्रीने शेअर केला शेतातील व्हिडिओ

मृण्मयी देशपांडे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांत काम करून मृण्मयीने कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. 'नटसम्राट', 'फत्तेशिकस्त', 'सुभेदार', 'चंद्रमुखी', 'भाई : व्यक्ती की वल्ली' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून मृण्मयीने प्रेक्षकांचं मनात स्थान निर्माण केलं. ग्लॅमरच्या दुनियेतील  या अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी निसर्गाच्या सानिध्यात महाबळेश्वर येथे घर बांधलं. 

अनेकदा मृण्मयी तिच्या घराचे व्हिडिओही शेअर करताना दिसते. घराच्या बाजूलाच तिने छोट्या जागेत विविध भाज्या लावल्याचंही सांगितलं होतं. आता मृण्मयीने तिच्या शेतात स्ट्रॉबेरी पिकवली आहे. नुकताच याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत मृ्ण्मयी आणि तिचा नवरा शेतात पिकवलेल्या स्ट्रॉबेरी काढताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत मृण्मयीने तिच्या शेताचीही खास झलक दाखवली आहे. स्वत:च्या शेतातील स्ट्रॉबेरी काढल्याचा आनंद मृण्मयीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. 

स्ट्रॉबेरीबरोबरच मृण्मयी शेतात दुधी, बीन्स, काकडी आणि रानभाज्याही पिकवते. याचे फोटोही तिने शेअर केले होते. दरम्यान, मृण्मयीने २०१६ साली स्वप्निल रावबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. मृण्मयी आणि स्वप्निलने मिळून निसर्गाच्या सानिध्यात त्यांच्या स्वप्नातील हे घर बांधलं आहे. 

Web Title: marathi actress mrunmayee deshpande shared video of harvesting strawberry of her own farm