होम मिनिस्टर! सिद्धार्थने अचूक ओळखलं मितालीच्या मनातलं; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 18:28 IST2023-04-27T18:28:25+5:302023-04-27T18:28:56+5:30
Mitali Mayekar: या व्हिडीओमध्ये ती आणि सिद्धार्थ स्वयंपाक करत आहेत.

होम मिनिस्टर! सिद्धार्थने अचूक ओळखलं मितालीच्या मनातलं; नेमकं काय घडलं?
मराठी कलाविश्वातील लाडकं आणि तितकंच चर्चेत असलेलं कपल म्हणजे मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर. आपल्या भन्नाट केमिस्ट्रीमुळे ही जोडी कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. बऱ्याचदा हे दोघं एकमेकांविषयीचे भन्नाट किस्से शेअर करत असतात. यात अलिकडेच मितालीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात किचनमध्ये स्वयंपाक करताना सिद्धार्थचा मूड कसा असतो हे तिने सांगितलं आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मितालीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आणि सिद्धार्थ स्वयंपाक करत आहेत. विशेष म्हणजे ती प्रत्येक मराठी घरात घडणारी गोष्ट तिच्याही घरात घडते हे तिने सांगायचा या व्हिडीओतून प्रयत्न केला आहे.
Vibe check for almost every Marathi household!, असं कॅप्शन देत तिन हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्वयंपाक करत असताना मध्येच तालामध्ये कढईवर चमचा वाजवते. हा आवाज ऐकल्यानंतर त्यावर ताल धरत सिद्धार्थ 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाचं टायटल सॉन्ग म्हणू लागतो.
दरम्यान, प्रत्येक घरात हे असं घडत असतं हे तिने यावरुन सांगायचा प्रयत्न केला आहे. सिद्धार्थ आणि मिताली मराठीतलं लोकप्रिय कपल आहे. या दोघांनी २०२१ मध्ये मोठ्या थाटात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर कमालीची चर्चा रंगली होती.