'बाहुबली'तल्या शिवगामीला या मराठमोळ्या अभिनेत्रीने दिलाय आवाज, अनुभव सांगताना म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:36 IST2025-08-23T16:35:42+5:302025-08-23T16:36:12+5:30
Baahubali Movie : एस.एस. राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा चित्रपट आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम मोडले आणि भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवीन ओळख मिळवून दिली. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये शिवगामी या पात्राला एका मराठमोळ्या अभिनेत्रीने आवाज दिला होता.

'बाहुबली'तल्या शिवगामीला या मराठमोळ्या अभिनेत्रीने दिलाय आवाज, अनुभव सांगताना म्हणाली...
एस.एस. राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा चित्रपट आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम मोडले आणि भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवीन ओळख मिळवून दिली. प्रभास (बाहुबली), राणा दग्गुबाती (भल्लालदेव), अनुष्का शेट्टी (देवसेना), तमन्ना भाटिया (अवंतिका), रम्या कृष्णन (शिवगामी), सत्यराज (कटप्पा) हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटात हिंदी रिमेकमध्ये शिवगामी या पात्राला एका मराठमोळ्या अभिनेत्रीने आवाज दिला होता. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून मेघना एरंडे आहे. नुकतेच एका मुलाखतीत तिने या अनुभवाबद्दल सांगितले.
डबिंग आर्टिस्ट म्हणून मेघनाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण केवळ एक डबिंग आर्टिस्टच नाही तर एक अभिनेत्री अशीही तिची ओळख आहे. तिने आतापर्यंत अनेक कार्टून कॅरेक्टर्सला आवाज दिला आहे. तसेच तिने मालिकेतील आणि सिनेमातील पात्रांनाही आवाज दिला आहे. नुकतेच तिने आरपार ऑनलाइन या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यात तिने तारक मेहता का उल्टा चष्मा आणि बाहुबलीतील शिवगामी पात्रासाठी केलेल्या डबिंगचा अनुभव शेअर केला.
'तारक मेहता'च्या टायटल साँगमधील पात्रांना दिला आवाज
मेघना म्हणाली की, '''तारक मेहता का उल्टा चष्मा'चं जे टायटल साँग आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा टप्पू येतो आणि म्हणतो प्रॉब्लेम है? सोल्यूशन है.. मग ती दया आणि मिसेस हाथी बोलायला लागतात, काम दिन रात करवाती मेरी सास है... मग ती सास म्हणते ठीक से साफ करो वगैरे असे एक पाच सहा आवाज आहेत तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये. आणि मग 'तारक मेहता का उल्टा चष्मा' वगैरे असं ते तर ते सगळे आवाज माझे आहेत. ''
शिवगामीला आवाज देण्याच्या अनुभवाबद्दल मेघना म्हणाली...
या मुलाखतीत शिवगामी कशी झाली, असे विचारल्यावर मेघना एरंडे म्हणाली की, ''शिवगामीला अष्टदिगपाल को साक्षी कर आपने जो दो वर दिये थे उसे ही तो मांग रही हू महाराज वगैरे असं आणि मग प्रवीण त्यांनी मला असं सांगितलं होतं की तू लक्षात घे तिचे दोन्ही काळ वेगळे आहेत. एकामध्ये ती आई आहे. एकामध्ये ती आजी आहे. तर तेव्हा त्यांनी मला थोडंसं तरुण साउंड हो असं सांगितलं आणि दुसऱ्यामध्ये आणि मला वाटतंय एवढं त्या अॅक्चुअल बाहुबलीमध्ये पण विचार केला गेला असेल तर माहिती नाही मला पण त्यांचं वर्किंग बघ ना दिग्दर्शक म्हणून. इथे ती आजी आहे ना आणि इथे तिची आई, तिचं वात्सल्य तिची करुणा हे दाखव आणि इथे तिचा उद्वेग, तिला झालेला त्रास, तिची मानहानी हे दाखव. म्हणजे एक दिग्दर्शकसुद्धा तुझ्या आवाजाचे किती पटलं बदलू शकतो. याचं मला खरं जिवंत उदाहरण म्हणजे प्रवीणजीनी जे केलं ते. ''