तिरछी टोपीवाली ओ...ओ...! या लूकमध्ये मराठी अभिनेत्रीला ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 13:38 IST2019-07-15T13:36:23+5:302019-07-15T13:38:14+5:30

सोशल मीडियावर या मराठी अभिनेत्रीचा बोलबाला पाहायला मिळतोय.

Marathi actress Mayuri Deshmukh glamrous look on instagram | तिरछी टोपीवाली ओ...ओ...! या लूकमध्ये मराठी अभिनेत्रीला ओळखणंही झालंय कठीण

तिरछी टोपीवाली ओ...ओ...! या लूकमध्ये मराठी अभिनेत्रीला ओळखणंही झालंय कठीण

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या मयुरी देशमुखचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतोय. त्याला कारणीभूत आहे तिचे इन्स्टाग्रामवरचे फोटो. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती ओळखतादेखील येत नाही. 

मयुरी देशमुख हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती खूप ग्लॅमरस दिसते आहे. या फोटोत मयुरीनं पिवळ्या रंगाचा गेटअप केला आहे. तसेच तिने ग्रे रंगांचे लेन्स लावले आहेत आणि काळ्या रंगाची टोपी हातात तिरकस धरली आहे. तिचा हा लूक पाहून ती ओळखता देखील येत नाही. तिचा हा लूक तिच्या फॅन्सना भावला आहे.  तिच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

सोशल मीडियावर मयुरी नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. 

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे 'डिअर आजो' हे मयुरीचे नाटक खूपच गाजले होते. या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली होती.

तसेच खुलता कळी खुलेना या मालिकेत तिने साकारलेली मानसीची भूमिका ही खूपच गाजली होती. तसेच मयुरीचा 'लग्नकल्लोळ' सिनेमा प्रदर्शित झाला.

यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत होते.

Web Title: Marathi actress Mayuri Deshmukh glamrous look on instagram