" पर लोग मुझे गिराने मे कई बार गिरे…." अभिनेत्री मानसी नाईकची ती पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 17:18 IST2022-03-19T17:13:31+5:302022-03-19T17:18:15+5:30
मानसी नाईकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

" पर लोग मुझे गिराने मे कई बार गिरे…." अभिनेत्री मानसी नाईकची ती पोस्ट चर्चेत
आपल्या नृत्य आणि अभिनय कौशल्याने रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक (Manasi Naik). अभिनेत्री मानसी नाईक चित्रपट किंवा मालिकेत भलेही काम करताना दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत येत असते. पुन्हा एकदा ती इंस्टाग्रामवरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे.. मानसी नाईकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. न मैं गिरा, और न मेरी उम्मीदों के मीनार गिरे पर लोग मुझे गिराने मे कई बार गिरे… अशी पोस्ट मानसीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टचे अनेकांनी कौतुक केले आहे. तर काहींना प्रश्न पडलाय की, ही पोस्ट नेमकी तिने कोणासाठी लिहिली आहे.
मानसी नाईक मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीं आहे. 'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. 'बाई वाडयावर या' हे गाणे हिट ठरले होते. मानसी नाईक व प्रदीप खरेरासोबत १९ जानेवारी, २०२१ला लग्नबंधनात अडकली. मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे.