"रमी खेळाची जाहिरात केली कारण..." सततच्या ट्रोलिंगवर गिरीजा ओक पहिल्यांदाच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 09:56 AM2023-09-07T09:56:30+5:302023-09-07T09:57:19+5:30

ती जाहिरात केल्याने मी आजही ट्रोल होते.

marathi actress girija oak speaks on rummy advertisement done by her and social media trolling | "रमी खेळाची जाहिरात केली कारण..." सततच्या ट्रोलिंगवर गिरीजा ओक पहिल्यांदाच बोलली

"रमी खेळाची जाहिरात केली कारण..." सततच्या ट्रोलिंगवर गिरीजा ओक पहिल्यांदाच बोलली

googlenewsNext

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) तिच्या अभिनयामुळे नेहमीच सर्वांना प्रेमात पाडते. गिरीजा मोजक्या भूमिका करते पण अगदी परफेक्ट करते. तिचा वेगळा चाहतावर्ग आहे. गिरीजाने मराठीसोबतच हिंदीतही काम केलं आहे. मध्यंतरी मराठी कलाकार ऑनलाईन खेळाच्या जाहिराती केल्याने ट्रोल झाले होते. यामध्ये गिरीजाही होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने जाहिरात करण्याचं मागचं कारण सांगितलं आहे. 

गिरीजा ओक मराठीतील लोकप्रिय चेहरा आहे. सध्या ती शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमात अॅक्शन करताना दिसत आहे. यानिमित्त तिने 'मित्र म्हणे' युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. मराठी कलाकारांनी ऑनलाईन खेळाच्या जाहिराती केल्या होत्या ज्यावर त्यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं. गिरीजानेही ही जाहिरात केली होती. यावर तिने मुलाखतीत उत्तर दिलं आहे. 

गिरीजा म्हणाली, 'ती जाहिरात केल्याने मी आजही ट्रोल होते. माझ्या प्रत्येक पोस्टवर कमेंट्स मध्ये त्यावरुन बोललं जातं. पण मी त्या जाहिरातीकडे एक प्रोजेक्ट म्हणून पाहिलं. जाहिरात न केल्याने लोक खेळणं बंद करणार आहेत का? मी याचा मूल्यांच्या दृष्टीने विचार केला नाही. मी फेअरनेस क्रीम्सच्या जाहिराती कधीच केल्या नाहीत. कारण त्वचेचा मूळ रंग बदलत नाही. ते चुकीचंच आहे. पण मी रमी खेळा म्हटलं तर त्याने लगेच फरक पडेल असं मला वाटत नाही. ती तुमची निवड आहे. दारु प्यायची की नाही, तंबाखू खायचा की नाही, रमी खेळायची की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे.'

गिरीजा शाहरुख खानसोबत 'जवान' सिनेमात दिसत आहे. ती पहिल्यांदाच अॅक्शन करताना दिसणार आहे. गिरीजा अशा भूमिकेत आहे जे तिने आतापर्यंत कधीच केलेलं नाही. त्यामुळे गिरीजाला आणखी एका हिंदी सिनेमात बघायला तिचे चाहते आतुर आहेत.

 

Web Title: marathi actress girija oak speaks on rummy advertisement done by her and social media trolling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.