'दे धक्का2'मध्ये अवतरली मस्तानी, गौरीचा लूक मस्तानी व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 17:23 IST2022-07-28T13:05:14+5:302022-07-28T17:23:48+5:30

‘दे धक्का 2’मध्ये सुद्धा मकरंद जाधव आणि कुटुंबीय त्यांच्या जुन्या धमाल अंदाजात पुन्हा भेटीला येणार आहेत. यातील गौरीचा मस्तानी लूक व्हायरल होतोय.

Marathi actress Gauri Ingawale Mastani look viral. from 'De Dhakka 2' movie | 'दे धक्का2'मध्ये अवतरली मस्तानी, गौरीचा लूक मस्तानी व्हायरल

'दे धक्का2'मध्ये अवतरली मस्तानी, गौरीचा लूक मस्तानी व्हायरल

दे धक्का २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल १४ वर्षांनंतर हा या चित्रपटाचा सिक्वल प्रेत्रकांच्या भेटीला येतोय. मात्र चित्रपटातील सगळी पात्र तिच असली तरी. चित्रपटातील  मात्र सायली बदलली आहे. पूर्वी असलेली गौरी  वैद्य आता दिसणार नाही तर गौरी इंगवले हिने तिची जागा घेतली आहे. दरम्यान चित्रपटातील गौरीच्या लुकचा एक खास व्हिडीओ तिने शेअर केला आहे.


गौरीचा हा लूक गर भिंगरी या गाण्यातील आहे. दे धक्का २ मधील हे गाणं  प्रदर्शित करण्यात आलं आहे. त्याचा बीटीएस व्हिडीओ गौरीने शेअर केला आहे.  तिने व्हि़डीओला कॅप्शन देत लिहिलं आहे, Stay calm…Its not Deewani Mastani, Its our GAR GAR BHANGARI 💃🏻 Song out now! #dedhakka2 #गरगरभिंगरी असं तिने म्हटलं आहे. दे धक्का पुढील आठवड्यात म्हणजेच ५ ऑगस्टला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

‘दे धक्का’ इतकाच ‘दे धक्का 2’ भन्नाट आहे. यातून आम्हाला काहीही तत्त्वज्ञान सांगायचं नाहीये. हा सिनेमा म्हणजे पूर्णपणे एंटरटेनमेंट आहे, असं मांजरेकर म्हणाले. गौरीचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी गौरी काही महिन्यांपूर्वी आलेल्या पांघरून या चित्रपटात दिसली होती.

Web Title: Marathi actress Gauri Ingawale Mastani look viral. from 'De Dhakka 2' movie