मराठमोळ्या दीप्ती सती समुद्र किनारी दिसली स्टायलिश अंदाजात, फोटोला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 07:00 IST2021-01-25T07:00:00+5:302021-01-25T07:00:00+5:30

अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

Marathi Actress Deepti Sati beach looks stylish in style, photo is a favorite | मराठमोळ्या दीप्ती सती समुद्र किनारी दिसली स्टायलिश अंदाजात, फोटोला मिळतेय पसंती

मराठमोळ्या दीप्ती सती समुद्र किनारी दिसली स्टायलिश अंदाजात, फोटोला मिळतेय पसंती

अभिनेत्री दीप्ती सती सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. दीप्ती तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या फोटोतील अंदाज तिच्या फॅन्सनादेखील चांगलाच भावतो. नुकताच दिप्तीने समुद्राच्या किनारी आणि पाण्यात मस्ती करतानाचे फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोंना चांगली पसंती मिळते आहे.

दीप्ती सती हिने इंस्टाग्रामवर समुद्राच्या ठिकाणी केलेले फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोशूटमध्ये ती खूप ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसते आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. या फोटोशूटमध्ये दीप्ती सतीने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पॅण्ट घातली आहे. 


अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले.


इतकेच नाही तर या चित्रपटात दीप्ती बोल्ड व ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली. इतकेच नाही तर ती या चित्रपटात बिकनीमध्ये ती पहायला मिळाली होती. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती.

या सिनेमासाठी दीप्तीची निवड ९६ मुलींच्या ऑडिशन्समधून झाली होती. त्यानंतर ती कोणत्याच सिनेमात पहायला मिळाली नाही.

मराठी सिनेमांमध्ये जरी दीप्तीचा वावर कमी दिसत असला तरी साऊथमध्ये दीप्तीचा चांगलाच बोलबाला आहे.

Web Title: Marathi Actress Deepti Sati beach looks stylish in style, photo is a favorite