"कोणावर तरी विनोद करणं...", स्टॅंडअप कॉमेडीबद्दल मराठी अभिनेत्रीने मांडलं मत, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:55 IST2025-07-02T11:53:29+5:302025-07-02T11:55:57+5:30

स्टॅंडअप कॉमेडीबद्दल मराठी अभिनेत्रीने मांडलं मत, नेमकं काय म्हणाली?

marathi actress anuja sathe expresses her opinion on stand up comedy says | "कोणावर तरी विनोद करणं...", स्टॅंडअप कॉमेडीबद्दल मराठी अभिनेत्रीने मांडलं मत, म्हणाली...

"कोणावर तरी विनोद करणं...", स्टॅंडअप कॉमेडीबद्दल मराठी अभिनेत्रीने मांडलं मत, म्हणाली...

Marathi Actress Anuja Sathe: अभिनेत्री अनुजा साठे (Anuja Sathe)ही मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी आहे. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 'एक थी बेगम' या सीरिजच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आलेल्या अनुजाने आतापर्यंत अनेक नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या ही अभिनेत्री एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये अनुजाने सध्याच्या विनोदाबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. 

नुकतीच अनुजा साठेने 'आरपार' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी अभिनेत्रीने स्टॅंड अप कॉमेडीबद्दल म्हणाली, "काही स्टॅंडअप कॉमेडियन आहेत जे मला आवडतात. त्यांनी केलेले विनोद छान असतात. त्यामध्ये काही मराठी  मुलं देखील आहेत, जे खूप चांगली कॉमेडी करतात. पण, काही वेळेस कोणावर तरी विनोद करणं याला कॉमेडी म्हणत नाहीत. प्रसंगानुसार असेल तर मला देखील ते आवडतात. मी एक अनुभव सांगते की कपिल शर्मा शोमध्ये मी तीन वेळा गेले होते. आम्ही तिकडे असताना जी स्किट्स झाली, ती फारच छान होती. पण, कोणाचा अपमान होईल असे ते विनोद करत नाही. ते खूप निखळ असतात. " असं अभिनेत्रीने स्पष्टपणे सांगितलं. 

वर्कफ्रंट

अभिनेत्री अनुजा साठेच्या कामाबद्दल बोलायटचं झालं तर तिने 'परमाणू', 'बाजीराव मस्तानी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय 'महाराणी-२' या वेब सीरिजमध्येही ती झळकली आहे. लवकरच ती पृथ्वीराज चौहान मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Web Title: marathi actress anuja sathe expresses her opinion on stand up comedy says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.