‘दोनाचे चार हात झालेच...’, विराजस कुलकर्णीनं शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 16:58 IST2022-05-01T16:54:58+5:302022-05-01T16:58:06+5:30

Virajas Kulkarni : खरं तर लग्नाचा मुहूर्त ठरला आहे. पण लग्न होत नाही तोपर्यंत ‘दोनाचे चार हात कधी होणार?’, हा टिपिकल प्रश्न पाठ सोडायचा नाही. आता हा प्रश्न विचारणाऱ्यांना विराजसने मजेशीर अंदाजात उत्तर दिलं आहे.

marathi actor Virajas Kulkarni share funny video ties khot with Shivani Rangole | ‘दोनाचे चार हात झालेच...’, विराजस कुलकर्णीनं शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही...!

‘दोनाचे चार हात झालेच...’, विराजस कुलकर्णीनं शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही...!

अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा लेक विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत ( Shivani Rangole) तो लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. खरं तर लग्नाचा मुहूर्त ठरला आहे. पण लग्न होत नाही तोपर्यंत ‘दोनाचे चार हात कधी होणार?’, हा टिपिकल प्रश्न पाठ काही सोडायचा नाही. आता हा प्रश्न विचारणाऱ्यांना विराजसने मजेशीर अंदाजात उत्तर दिलं आहे.
होय,  दोनाचे चार हात कधी होणार?असं विचारणाऱ्यांना विराजसने असं काही उत्तर दिलं की सगळेच हैराण झालेत. 
विराजसने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

यामध्ये विराजसच्या हातात एका लेडीचे कृत्रीम म्हणजे फायबरचे सुंदर हात आहेत. तो हात घेऊन तो पोझ देताना दिसत आहे. ‘दोनाचे चार हात कधी होणार, असं विचारल्यावर मी... ’, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे.
त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. अनेकांना त्याचा हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे. तू ना तूच आहेस, असं एकाने यावर लिहिलं आहे. अन्य एकाने, देवा काहीही करू शकतोस रे बाबा...,अशी कमेंट केली आहे. झाले एकदाचे, अशी कमेंट अनेकांनी केली आहे.

 विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे  दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आपलं नातं त्यांनी कधीच कुणापासून लपवलं नाही.  काही दिवसांपूर्वीच या दोघांनी साखरपुडा केला होता. येत्या 7 मे रोजी हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे.  

काही दिवसांपूर्वी  विराजस आणि शिवानी यांनी एका जाहिरातीसाठी लग्नाचं चित्रीकरण केलं होतं. त्यावेळेस सोशल मीडियावर शिवानी आणि विराजस यांनी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यांनी एका ज्वेलरी ब्रॅण्डसाठी ते चित्रीकरण केलं होतं हे नंतर उघड झालं होतं. आता अखेर ते दोघे खरंच विवाहबंधनात अडकायला तयार आहे.  
 डावीकडून चौथी बिल्डिंग  या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. याच नाटकाच्या सेटवर विराजस व शिवानी पहिल्यांदा भेटले होते.  विराजसनं  होस्टेल डेज या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.  

Web Title: marathi actor Virajas Kulkarni share funny video ties khot with Shivani Rangole