"त्यांचा सहवास...", बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी सांगताना विजय गोखले भावुक, शेअर केला 'तो' प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 18:16 IST2026-04-10T18:12:46+5:302026-04-10T18:16:21+5:30
"माझे वडील गेल्यानंतर...", विजय गोखलेंनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीचा भावुक प्रसंग,म्हणाले...

"त्यांचा सहवास...", बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी सांगताना विजय गोखले भावुक, शेअर केला 'तो' प्रसंग
Marathi Actor Vijay Gokhale : मराठी सिनेसृष्टीत नाटक, चित्रपट, मालिका यांसारख्या तीनही माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेते म्हणजे विजय गोखले.विजय गोखले यांनी आजवर त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आपल्या सकस अभिनयाच्या जोरावर त्यांनी भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सध्या ते एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा आठवणीतला किस्सा शेअर केला आहे.
नुकतीच विजय गोखले यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अभिनय प्रवासासह बऱ्याच दिलखुलासपणे गप्पा मारल्या. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांची भावुक आठवण देखील शेअर केली. त्यावेळी या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, "बाळासाहेबांचा सहवास मला लाभला. ते म्हणजे मुक्त माणूस. माझ्या वडिलांमुळे आमच्या गाठीभेटी झाल्या."
यापुढे मुलाखतीत ते म्हणाले," तेव्हा माझ्या मालिका चालू होत्या. त्यावेळी चित्रपट सेना जे सांभाळायचे गजाभाऊ शिर्के यांचं निधन झालं, त्यावेळी मी बाळासाहेबांना म्हटलं, तुम्ही आमच्यासाठी एवढं करता. माझे वडील गेल्यानंतर बाळासाहेब आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आलेले. आमचा विद्याधर गोखले नाट्यमहोत्सव बाळासाहेबांनी सुरू करून दिला. त्याचं आर्थिक आणि मानसिक सहकार्य बाळासाहेब ठाकरेंनी केलंय. मी त्यांना सहज विचारलं, तुम्ही एवढं करता तर मीसुद्धा संघटनेसाठी करू इच्छितो. मी ही जबाबदारी सांभाळू का? त्यावर ते म्हणाले, 'काही करू नकोस, आहेस तिथे सुखी आहेस.' अशी भावुक आठवण विजय गोखले यांनी शेअर केली.
वर्कफ्रंट
विजय गोखले हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी 'भरत आला परत', 'एक उनाड दिवस', 'मुंबईचा डबेवाला', 'पछाडलेला', 'तीन बायका फजिती ऐका', 'सोन्याची मुंबई' यांसारख्या सिनेमांमध्ये आणि 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रंगभूमीसाठी त्यांचं मोलाचं योगदाना आहे.