"ग्रुपिझम आहे, असणारच पण...", मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल विद्याधर जोशी स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:37 IST2025-07-09T12:35:12+5:302025-07-09T12:37:32+5:30
मराठी इंडस्ट्रीत ग्रुपिझम आहे का? विद्याधर जोशींची प्रतिक्रिया चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

"ग्रुपिझम आहे, असणारच पण...", मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल विद्याधर जोशी स्पष्टच बोलले
Vidyadhar Joshi: विविध मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे अभिनेते म्हणजे विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi). अभिनेते विद्याधर जोशी यांना मराठी इंडस्ट्रीत बाप्पा म्हणून ओळखलं जातं. गंभीर आजारावर मात करुन त्यांनी पु,ल. देशपांडेंच्या गाजलेल्या 'सुंदर मी होणार' नाटकातून रंगभूमीवर कमबॅक केलं. शिवाय अलिकडेच ते छोट्या पडद्यावरील येडं लागलं प्रेमाचं मालिकेत पाहायला मिळाले. अशातच अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत विद्याधर जोशींनी इंडस्ट्रीतील गटाबाजीबद्दल आपलं मत मांडलं आहे.
अभिनेते विद्याधर जोशी यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास फार मोठा आहे. नुकतीच त्यांनी 'राजश्री मराठी' ला मुलाखत दिली. या मुलीखतमध्ये त्यांनी मराठी इंडस्ट्रीतील ग्रुपिझमबद्दल भाष्य केलं आहे. त्याविषयी बोलताना त्यांनी म्हटलं, "ग्रुपिझम आहे, पण मला काय वाटतं की ते थोड्याफार प्रमाणात असणारच. म्हणजे मला एखाद्या कलाकाराबरोबर काम करताना सहजपणा वाटला तर पुढे एखाद्या प्रोजेक्टमध्ये एखाद्या भूमिकेसाठी विचार केला जातो. त्यामुळे थोडाफार ग्रुपिझम होतो आणि तो होत राहणार."
त्यानंतर ते म्हणाले, "पण, या गोष्टींचा मी कधीच विचार केला नाही. मला एखाद्याने त्यांच्या ग्रुपमध्ये घेतलं नाही तर मी काय करणार? मी त्याच्यावर रागावू शकत नाही. मी ज्या ग्रुपमध्ये असतो किंवा जिकडे मी काम करतो आहे. ते काम मी शंभर टक्के करेन, कधीतरी जर समोरच्या माणसाला अडचण आली की, त्यांचा एखादा माणूस कमी असेल तर तेव्हा आपला विचार सुद्धा ते करु शकतात. तो विचार करायला माझं आधीचं काम भाग पाडेल. त्यामुळे आपलं काम चांगलं असण गरजेचं आहे. एखाद्या ग्रुपमध्ये जाऊन किंवा टाईमपास करुन काम मिळतच असं नाही. त्यामुळे आपलं आधीचं काम बघूनच लोक दुसरा माणूस आपला त्या भूमिकेसाठी विचार करु शकतो. त्यामुळे ग्रुपिझम असलं तरी हरकत नाही. आपण आपलं काम करत राहायचं." असा खुलासा त्यांनी या मुलाखतीमध्ये केला.