उगाचच मोठेपणा करु नकोस म्हणणाऱ्या चाहतीला सोहम बांदेकरनं सुनावलं, म्हणाला - माझी किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 14:20 IST2023-07-22T14:17:59+5:302023-07-22T14:20:40+5:30

एका चाहतीने सोहमचा हा फोटो पोस्ट करत प्रश्न विचारला. याला सोहमने सडेतोड उत्तर देत तिची बोलती बंद केली आहे.

Marathi actor soham bandekar reply fan comment said i dont act pricey | उगाचच मोठेपणा करु नकोस म्हणणाऱ्या चाहतीला सोहम बांदेकरनं सुनावलं, म्हणाला - माझी किंमत...

उगाचच मोठेपणा करु नकोस म्हणणाऱ्या चाहतीला सोहम बांदेकरनं सुनावलं, म्हणाला - माझी किंमत...

आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल आहेत. सिनेसृष्टीतील आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आदेश व सुचित्रा यांचा लेक सोहम बांदेकरही अभिनेता आहे. मालिकांमध्ये काम करुन तो घराघरात पोहोचला. सोहम सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

बहुचर्चित 'बाईपण भारी देवा' या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा बांदेकर मुख्य भूमिकेत आहेत. तर सोहमने या चित्रपटात त्यांच्या मुलाची छोटीशी भूमिका साकारली आहे. एका चाहतीने चित्रपटातील सोहमचा हा फोटो पोस्ट करत प्रश्न विचारला. याला सोहमने सडेतोड उत्तर देत त्यांना तिची बोलती बंद केली आहे.  

''सर तुमचा ऑटोग्राफ मिळाले का? पुढे जाऊन तू तुझ्या आयुष्यात हेच कसलं तरी मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. आता उगाचच मोठेपणा करु नकोस'' असे एका चाहतीने सोहमचा बाईपण भारी देवामधला एका सीनचा फोटो इन्स्टावर शेअर करत म्हटलंय. 

सोहमने याचा स्क्रिन शॉट त्याच्या इन्स्टावर शेअर करत याला उत्तर दिलं आहे. मला माझी किंमत माहिती आहे मी अजिबात मोठेपणा करत नाही ,असे सोहमने म्हटले आहे.

दरम्यान सोहमही एक उत्तम अभिनेता आहे. 'बाईपण बारी देवा' या चित्रपटात त्याने सुचित्रा यांच्या मुलाची भूमिका साकारली आहे. नुकतीच या चित्रपटाची सक्सेस पार्टी पार पाडली. चित्रपटाला मिळणारं भरघोस यश पाहून कलाकारांसह दिग्दर्शक केदार शिंदेही भारावून गेले आहेत. अभिनयाबरोबर सोहमने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. सध्या तो ठरलं तर मग या मालिकेची निर्मिती करत आहे.

Web Title: Marathi actor soham bandekar reply fan comment said i dont act pricey