Video: सिद्धार्थ जाधवने सुरु केला वडापावचा व्यवसाय?; अभिनेत्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 16:34 IST2024-02-28T16:34:01+5:302024-02-28T16:34:26+5:30
Siddharth jadhav: सिद्धार्थचा लालबागमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधये सिद्धार्थ वडापाव विकताना दिसत आहे.

Video: सिद्धार्थ जाधवने सुरु केला वडापावचा व्यवसाय?; अभिनेत्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल
मराठी कलाविश्वातील सुपर एनर्जेटिक अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav). उत्तम अभिनयकौशल्य आणि स्वभावातील साधेपणा यांच्या जोरावर सिद्धार्थने आजवर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे आज त्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. सिद्धार्थ कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत असतो. यावेळीही त्याने असंच काहीसं केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो चक्क वडापाव विकताना दिसत आहे. सिद्धार्थचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करत त्याला अनेक प्रश्न विचारले आहेत.
सिद्धार्थने लालबागमधील एका वडापावच्या गाडीवर अचानक एंट्री केली. आणि, मोठ्या प्रेमाने तेथील ग्राहकांना वडापाव विकला. इतकंच नाही तर त्याच्या हटके शैलीमध्ये त्याने ग्राहकांना बोलावूनही घेतलं.