Video: भारताचा तिरंगा नाही तर पाकिस्तानचा झेंडा..; शशांकला आला न्यूयॉर्कमध्ये वाईट अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 14:00 IST2022-08-17T14:00:00+5:302022-08-17T14:00:00+5:30

Shashank ketkar:या व्हिडीओत न्यूयॉर्कमध्ये १५ ऑगस्टच्या दिवशी भारताचा राष्ट्रध्वज फडकावण्याऐवजी पाकिस्तानचा झेंडा लावल्याचं त्याने सांगितलं.

marathi actor shashank ketkar feels bad in new york after seeing pakistan flag | Video: भारताचा तिरंगा नाही तर पाकिस्तानचा झेंडा..; शशांकला आला न्यूयॉर्कमध्ये वाईट अनुभव

Video: भारताचा तिरंगा नाही तर पाकिस्तानचा झेंडा..; शशांकला आला न्यूयॉर्कमध्ये वाईट अनुभव

मराठी कलाविश्वातील हॅण्डसम हंक म्हणजे शशांक केतकर. उत्तम अभिनयासह पर्सनालिटीमुळे शशांक तरुणींमध्ये कायम चर्चेत असते. कलाविश्वाच सक्रीय असलेला शशांक सोशल मीडियावरही तितकाच अॅक्टीव्ह असून तो कायम त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट चाहत्यांना देत असतो. सध्या शशांकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने न्यूयॉर्कमध्ये त्याला आलेल्या एका वाईट अनुभवाचं कथन केलं आहे.

सध्या शशांक न्यूयॉर्कमध्ये असून येथील अनेक फोटो, व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्येच त्याने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओत न्यूयॉर्कमध्ये १५ ऑगस्टच्या दिवशी भारताचा राष्ट्रध्वज फडकावण्याऐवजी पाकिस्तानचा झेंडा लावल्याचं त्याने सांगितलं. तसंच हे अत्यंत खेदजनक असल्याचंही तो म्हणाला.

"नमस्कार, मी सध्या आहे न्यूयॉर्क सिटीमध्ये. इथल्या सगळ्यात जास्त गजबजलेल्या भागांपैकी हा एक भाग मानला जातो. माझ्या मागे ज्या बिल्डिंग दिसतायेत तो वॉलस्ट्रीटचा भाग आहेत. येथेच न्यूयॉर्कचं स्टॉक एक्सचेंज चालतं. करोडोंची उलाढाल येथे होते.आणि, माझ्या समोर एक ब्रीज दिसेल. हा ब्रीज कायम गजबजलेला असतो. इथे खूप जण हा ब्रीज पाहण्यासाठी रांग लावतात. यात भारतीयांचाही समावेश आहे. या ब्रीजवर एक अमेरिकेचा आणि सोबत पाकिस्तानचा झेंडा लावल्याचं पाहायला मिळत आहे. ते का हे तर मला माहित नाही. पण,  कदाचित १४ ऑगस्टच्या निमित्ताने तो लावला असेल. मात्र, तो दिवस संपल्यानंतर हा झेंडा खाली घेऊन भारताचा झेंडा लावायला हवा होता", असं शशांक म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. माझ्यासारख्या भारतीय किंवा देशप्रेम असलेल्यांसोबत ही खेदाची बाब शेअर करावी असं वाटलं. त्याने पुढे काय होईल मला माहित नाही. पण, मला हे शेअर करावंसं वाटतं. अनेक भारतीय देखील या शहराच्या प्रगतीमध्ये आपला हातभार लावत आहे. मात्र कुणाचंच लक्ष त्याकडे गेलेलं नाही."

दरम्यान, शशांकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. शशांक सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा समाजात घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत असतो.
 

Web Title: marathi actor shashank ketkar feels bad in new york after seeing pakistan flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.