Sayali Sanjeev : परत ये ना... प्लीज..., सायली संजीवची बाबांसाठी भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 10:29 IST2022-11-30T10:27:29+5:302022-11-30T10:29:54+5:30

Sayali Sanjeev : सायलीच्या बाबांना जाऊन आज एक वर्ष पूर्ण झालं. बाबांच्या आठवणीत सायलीनं एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

marathi actor Sayali Sanjeev emotional POST for father on his death anniversary | Sayali Sanjeev : परत ये ना... प्लीज..., सायली संजीवची बाबांसाठी भावुक पोस्ट

Sayali Sanjeev : परत ये ना... प्लीज..., सायली संजीवची बाबांसाठी भावुक पोस्ट

प्रेक्षकांना वेड लावणारी लोभस चेहऱ्याची मराठी अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev) एक भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिची ही पोस्ट वाचून कोणतंही संवेदनशील मन क्षणभर सैरभैर होईल. सायलीच्या बाबांना जाऊन आज एक वर्ष पूर्ण झालं. गेल्यावर्षी 30 नोव्हेंबरलाच सायलीच्या बाबांचं निधन झालं होतं. बाबांच्या आठवणीत सायलीनं एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

बाबांसोबतचा एक सुंदर फोटो तिने शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने तिच्या लाडक्या बाबाला परत येण्याची विनंती केली आहे.

‘राहिले की एक वर्ष तुझ्याशिवाय.. खूप झालं बास..नाही शक्य... आजही मला हवा आहेस तू... परत ये ना... प्लीज...
साद हि घालते लाडकी तुला.. जगण्या तू दिला माझ्या जीवा अर्थ खरा..बाबा...’,असं सायलीने लिहिलं आहे.

सायलीचे वडील संजीव हे कर्करोगाने ग्रस्त होते. यातच 30 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायली बाबांच्या अतिशय जवळ होती. तिचा बाबा तिचा बाबा कमी अन् मित्र जास्त होता. बाबांच्या निधनाच्या दु:खातून अद्यापही सायली सावरू शकलेली नाही. सोशल मीडियावर ती अनेकदा त्यांच्याबद्दल भावुक पोस्ट शेअर करताना दिसते. बाबा गेल्यानंतर तिने बाबांच्या आठवणीत एक टॅटू गोंदवून घेतला होता. शिवाय बाबांचं नाव असलेली गोधडी शिवून घेतली होती.

सायलीने पहिल्याच मालिकेतून अवघ्या चाहत्यांची मनं जिंकलीत. ‘काहे दिया परदेस’ ही तिची पहिली मालिका. यानंतर आता  ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत सायलीने साकारलेल्या शर्वरी या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होते. ‘झिम्मा’या सुपरहिट चित्रपटातही ती दिसली. काही दिवसांपूर्वी ‘हर हर महादेव’ या चित्रपटात तिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तिची प्रमुख भूमिका असलेला ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट येत्या 2 डिसेंबरला प्रदर्शित होतो आहे.

Web Title: marathi actor Sayali Sanjeev emotional POST for father on his death anniversary