"...अन् लोकलमधून पडता पडता वाचलो", सयाजी शिंदेंनी सांगितला थरारक अनुभव, काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:01 IST2025-06-17T15:57:04+5:302025-06-17T16:01:03+5:30

"डोंबिवलीला जाताना लोकलमधून पडता पडता वाचलो" सयाजी शिंदेंनी सांगितला धक्कादायक प्रसंग, काय घडलं?

marathi actor sayaji shinde recounts the thrilling experience in mumbai local says | "...अन् लोकलमधून पडता पडता वाचलो", सयाजी शिंदेंनी सांगितला थरारक अनुभव, काय घडलं होतं?

"...अन् लोकलमधून पडता पडता वाचलो", सयाजी शिंदेंनी सांगितला थरारक अनुभव, काय घडलं होतं?

Sayaji Shinde : मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकलच्या अपघातात मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अलिकडेच मुंबईत मुंब्रा रेल्वे अपघाताची घटना घडली. यामध्ये ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर ९ जण जखमी झाले. या घटनेवर राजकीय क्षेत्रासह मनोरंजन विश्वातील कलाकारांनी  प्रतिक्रिया दिल्या. याप्रकरणी आता  मराठी अभिनेते सयाजी शिंदे व्यक्त झाले आहेत. अभिनेते सयाजी शिंदे सध्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या बहुचर्चित चित्रपटात आप्पा या भाईच्या भूमिकेत सयाजी शिंदे (Sayaji Shinde) दिसणार आहेत. याच निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सयाजी शिंदें यांनी मुंबई लोकल प्रवासाचा धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. 

अभिनेते सयाजी शिंदे यांनी 'तारांगण'ला दिलेल्या मुलाखतीत लोकल प्रवासाचाअनुभव शेअर केला आहे. त्याबद्दल सांगताना ते म्हणाले, मी पण डोंबिवलीला जाताना लोकलमधून पडता पडता वाचलो आहे. १९८७-८८ ची ही गोष्ट आहे. प्रचंड माणसांचा रेटा आणि लोकसंख्या इतकी भयानक वाढली आहे की त्याला टक्कर देण्यासाठी शासन अशावेळी काय करु शकतं? याला कसा न्याय द्यायचा आणि सिस्टिक कशी सुधारायची हे हजारों वर्षांपासून पडलेले प्रश्न कायमच भिजत पडले आहेत आणि ते चालूच राहता. शिवाय त्याच्यावर कशी मात करायची याबाबत मला देखील काही सूचलं नाही. तसंच यासाठी माणसाने स्वत: च्या अंत करणापासून कसं तयार व्हावं? आणि सिस्टिमला सुधारण्याचा प्रयत्न करावा, एवढी इच्छा आहे." असं त्यांनी सांगितलं.

सध्या आता मनोरंजनविश्वात ’वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ (All is Well Movie) या चित्रपटाची चर्चा रंगली आहे.अमर,अकबर, आणि अँथनी या तीन मित्रांच्या अतूट मैत्रीची धमाल गोष्ट 'ऑल इज वेल' या चित्रपटात आहे.  येत्या २७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. या चित्रपटाचे निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत.

Web Title: marathi actor sayaji shinde recounts the thrilling experience in mumbai local says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.