Video : हा काय संतोष जुवेकर हाय  ...? तो सेल्फी काढण्यासाठी आला अन् हड करून करून गेला...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 12:24 IST2022-04-13T12:24:25+5:302022-04-13T12:24:40+5:30

Santosh Juvekar :संतोष जुवेकरचे असंख्य चाहते आहेत आणि संतोषने चाहत्यांशीच संबंधित एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

marathi actor santosh juvekar share funny video viral on social media | Video : हा काय संतोष जुवेकर हाय  ...? तो सेल्फी काढण्यासाठी आला अन् हड करून करून गेला...!

Video : हा काय संतोष जुवेकर हाय  ...? तो सेल्फी काढण्यासाठी आला अन् हड करून करून गेला...!

झेंडा, प्रतिबिंब, शाळा, रेगे अशा कितीतरी चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर (Santosh Juvekar). संतोषने मालिकांपासून अभिनयाची केली आणि बघता बघता कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारा संतोष आज कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.  साहजिकच त्याचे असंख्य चाहते आहेत आणि संतोषने चाहत्यांशीच संबंधित एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.  व्हिडीओत सेल्फी घेण्यासाठी आलेला एक चाहता त्याची मजा घेताना दिसतोय.

या व्हिडीओत संतोष एका ट्रेनमध्ये प्रवास करत असल्याचे दिसतं.  तो गॉगल घालून सीटवर झोपलेला असतो. यादरम्यान ट्रेनमधील एक प्रवासी त्याच्या बाजूने जातो. त्याला सीटवर संतोष जुवेकरसारखी व्यक्ती झोपलेली दिसते. पण हा खरंच संतोष जुवेकरचं आहे ना? याबद्दल शंका असल्यानं तो पलीकडच्या सीटवर बसलेल्या अन्य एका प्रवाशाला विचारतो.  हा संतोष जुवेकर आहे का? असं तो विचारतो, यावर  प्रवासी होकारार्थी मान डोलावतो. खात्री झाल्यानंतर तो प्रवासी संतोष जुवेकरला उठवतो आणि सेल्फीसाठी विनंती करतो. पण संतोष जुवेकर सेल्फीसाठी जसा गॉगल काढतो, तसे त्या प्रवाशाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात.  हा काय संतोष जुवेकर आहे का? असं म्हणत तो तावातावात पुढे निघून जातो. बिचारा संतोष जुवेकर त्याच्याकडे नुसता पाहत राहतो.

या व्हिडीओला संतोषने दिलेलं कॅप्शनही मजेशीर आहे.‘आपल्याकडे काही लोकांना वाटत गॉगल घातला असेल तरच तो अ‍ॅक्टर नाहीतर कोणतरी फंट्टर... तोंडावर हड करून गेला...,’ असं त्याने लिहिलं आहे.त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

संतोषने मराठी-हिंदी चित्रपटांसोबतच अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे.  या गोजिरवाण्या घरात, वादळवाट, ऊन-पाऊस, किमयागार  या त्याच्या मालिका एकेकाळी तुफान गाजलेल्या आहेत.

Web Title: marathi actor santosh juvekar share funny video viral on social media