VIDEO : हाणा नाहीतर आपलं म्हणा..., संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 15:49 IST2022-09-19T15:49:05+5:302022-09-19T15:49:27+5:30

Santosh Juvekar : होय, संतोषने एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत भन्नाट कॅप्शन. त्याच्या या पोस्टवरच्या चाहत्यांच्या कमेंट्सही तितक्याच भन्नाट आहे.

marathi actor Santosh Juvekar post viral on social media | VIDEO : हाणा नाहीतर आपलं म्हणा..., संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत

VIDEO : हाणा नाहीतर आपलं म्हणा..., संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत

अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर (Santosh Juvekar).  झेंडा, मोरया, रेगे  यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून संतोषने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. दमदार अभिनयामुळे चर्चेत असणार संतोष सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान त्याची सोशल मीडियावर नुकतीच शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

होय, संतोषने एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत भन्नाट कॅप्शन. त्याच्या या पोस्टवरच्या चाहत्यांच्या कमेंट्सही तितक्याच भन्नाट आहे.

‘ नजरेला नजर लागू नये म्हणून हा नजरेला लावलेला काला टिक्का! ते म्हणतात कितीही काम केलं तरी हे असे व्हिडिओ बनवा. कारण आज काल म्हणे रिअलमध्ये नाही दिसलात तरी चालेल पण रीलमध्ये दिसणं महत्त्वाचं! काय बोलायचं आता सांगा?अहो सांगा खरंच, करा कमेंट्स आणि हाना नाहीतर आपलं म्हना....,’अशा कॅप्शनसह संतोषने व्हिडीओ शेअर केला आहे.
 यावर चाहत्यांनी एकापेक्षा एक भारी कमेंट्स केल्या आहेत. हमारा हिरो कैसा हो, संतोष भाऊ जैसा हो, असं एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे. ओरिजनल डोळेच एक नंबर आहेत तुझे... फुल ऑन कातिल, असं एकाने लिहिलं आहे. एका युजरने मात्र नको यार, डेव्हिल दिसतोय, असं लिहित असं काही शेअर न करण्याचं त्याला सुचवलं आहे.
संतोष जुवेकरने मराठी-हिंदी चित्रपटांसोबतच अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. या गोजिरवाण्या घरात, वादळवाट, ऊन-पाऊस, किमयागार या त्याच्या मालिका एकेकाळी तुफान गाजलेल्या आहेत. झेंडा, मोरया, रेगे यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून संतोषने रसिकांच्या मनावर छाप पाडली आहे.

अलीकडे आलिया भटच्या ‘डार्लिंग्ज’ या सिनेमात तो दिसला. आलिया भट्ट, विजय वर्मा, शेफाली शाह आणि रोशन मॅथ्यूज यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात संतोष जुवेकरने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

Web Title: marathi actor Santosh Juvekar post viral on social media