संतोष जुवेकरने खरेदी केली महागडी इलेक्ट्रिक सायकल, किंमत ऐकून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 15:57 IST2024-07-14T15:56:54+5:302024-07-14T15:57:34+5:30
अभिनेता संतोष जुवेकरने स्वतःसाठी महागडी सायकल खरेदी केलीय. किंमत ऐकून उंचावतील भुवया (santosh juvekar)

संतोष जुवेकरने खरेदी केली महागडी इलेक्ट्रिक सायकल, किंमत ऐकून व्हाल थक्क!
मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर विविध पोस्टच्या माध्यमातून चर्चेत असतो. संतोषला आपण आजवर विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय. संतोष सोशल मीडियावर विविध पोस्ट करुन त्याच्या आयुष्याबद्दलचे अपडेट देत असतो. संतोषने नुकतीच स्वतःसाठी महागडी आलिशान सायकल खरेदी केलीय. E MOTORAD कंपनीची ही इलेक्ट्रिक सायकल असून त्याची किंमत तब्बल ५० हजारांच्या वर आहे.
सायकल खरेदी केल्यावर संतोषची खास पोस्ट
संतोषने ही सायकल खरेदी केल्यावर सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिलीय. संतोष लिहितो, "माझ्या आयुष्यात आलेली माझी पहिली "किरन" माझ्या कुसुम आज्जीने माझ्यावर पाडली होती. oopss sorry मला बक्षीस म्हणून दिली होती. १०वी ला पास झालो होतो म्हणून. किती टक्के पडले असं विचारलं नाही तिने फक्त पास झाला ना माझा नातू ह्यातच ती खुश होती आणि तिने मला एक सायकल बक्षीस म्हणून घेऊन दिली. आहे आणि असेल त्यात आनंदी आणि खुश राहणं तिने दिल मला. आज्जी i miss u ग म्हणजे मला तुझी आठवण येते कायम."
संतोष पुढे लिहितो, "आज परत एक किरन माझ्या आयुष्यात पडलीये, म्हणजे मी ती लय घासून माझ्या आयुष्यात आणलीये आणि मला ती आज परत बक्षीस म्हणून मिळालीये,
माझ्या अभिनयातल्या मार्कांवर खुश होऊन. तरी अजूनही काठावरच पास होतोय. आज्जी....... एक दिवस नक्की बोर्डात येईन बघ मी. I promise you म्हणजे मी तूला शब्द देतो." संतोष लवकरच विकी कौशलच्या 'छावा' या हिंदी सिनेमात झळकणार आहे."