चाहतीच्या त्रासाला कंटाळून संग्राम समेळने अखेरीस उचलले हे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 07:36 PM2020-01-16T19:36:20+5:302020-01-16T19:42:24+5:30

एक चाहती सतत मेसेज करत असल्यामुळे संग्रामला मनस्ताप सहन करावा लागत आहे.

marathi actor sangram Samel fed up with her female fan | चाहतीच्या त्रासाला कंटाळून संग्राम समेळने अखेरीस उचलले हे पाऊल

चाहतीच्या त्रासाला कंटाळून संग्राम समेळने अखेरीस उचलले हे पाऊल

googlenewsNext
ठळक मुद्देसंग्रामने त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. स्वीटी सातारकर नामक तरुणी संग्रामला सतत मेसेज पाठवत आहे. दिवसभरात तिच्याकडून येणाऱ्या तीनशे ते चारशे मेसेजसमुळे संग्राम हैराण झाला आहे.

आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी, त्याची एक झलक पाहाण्यासाठी अनेक फॅन्स नेहमीच प्रयत्न करत असतात. सध्या तर सोशल मीडियाच्या जगतामुळे आपल्या आवडत्या कलाकाराला भेटणे हे फॅन्ससाठी खूपच सोपे झाले आहे. पण कधी कधी फॅन्स सतत पिच्छा करत असल्याने काही कलाकारांना मनस्ताप सहन करायला लागतो... असेच काहीसे संग्राम समेळसोबत नुकतेच घडले आहे.

रंगभूमी, मालिका आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला अभिनेता संग्राम समेळ चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्याला एक चाहती सतत मेसेज करत असल्यामुळे संग्रामला मनस्ताप सहन करावा लागत आहे.

संग्रामने त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. स्वीटी सातारकर नामक तरुणी संग्रामला सतत मेसेज पाठवत आहे. दिवसभरात तिच्याकडून येणाऱ्या तीनशे ते चारशे मेसेजसमुळे संग्राम हैराण झाला आहे. तिच्यापुढे हतबल झालो असून खाजगी आणि वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण होत आहेत. अशा प्रकारे कोणाचेही वागणे योग्य नाही. तिचे पालक तुमच्या परिचयात असल्यास त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचावा, असे संग्रामने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमातून अभिनेता संग्राम समेळने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ललित २०५' या मालिकेत तो दिसला होता. या मालिकेत त्याने नील राजाध्यक्षची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने 'एकच प्याला' या नाटकात काम केले. या संगीत नाटकातील त्याची सुधाकरची भूमिका प्रेक्षकांना आवडली. 

Web Title: marathi actor sangram Samel fed up with her female fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.