'सर्व राजकीय नेते आपआपसात भांडत आहेत. परंतु...'; संदीप पाठकचं थेट वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 08:01 PM2022-04-15T20:01:58+5:302022-04-15T20:02:59+5:30

Sandeep pathak: संदीपच्या या पोस्टमधून त्याची महाराष्ट्रातील जनतेप्रती असलेली कळकळ स्पष्टपणे दिसून येत आहे.

marathi actor sandeep pathak tweet about maharashtra politics goes viral on social media | 'सर्व राजकीय नेते आपआपसात भांडत आहेत. परंतु...'; संदीप पाठकचं थेट वक्तव्य

'सर्व राजकीय नेते आपआपसात भांडत आहेत. परंतु...'; संदीप पाठकचं थेट वक्तव्य

googlenewsNext

सध्या राज्यात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. यात खासकरुन  महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वच पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. इतकंच नाही तर, या राजकीय वादात सर्व राजकीय व्यक्तींचं मात्र सामान्य जनतेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.म म्हणूनच मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता संदीप पाठक याने ट्विट करत थेट सध्यस्थितीविषयी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटीमहाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर आपली मतं वक्तव्य करत आहेत. यामध्येच आता संदीप पाठकचीही भर पडली आहे. त्याने थेट ट्विट करत त्याचं मत मांडलं आहे.

‘सर्व राजकीय नेते आपआपसात भांडत आहेत. परंतु एकही पक्ष किंवा एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल एक चकार शब्द बोलत नाही. महागाई, वीजटंचाई, पाणी समस्या…’ असं ट्विट संदीपने त्याच्या अधिकृत ट्विटरवर शेअर केलं आहे.

दरम्यान, संदीपच्या या पोस्टमधून त्याची महाराष्ट्रातील जनतेप्रती असलेली कळकळ स्पष्टपणे दिसून येत आहे. इतकंच नाही तर, राज्यातील जनता ज्या समस्यांचा सामना करत आहे त्या समस्यांकडे त्याने राजकीय नेत्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सध्या त्याचं हे ट्विट चांगलंच चर्चिलं जात आहे.

Web Title: marathi actor sandeep pathak tweet about maharashtra politics goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.