"तिला तुमच्याशी लग्न करायचंय", बायकोसमोरच प्रसाद ओकला आलेला १९ वर्षांच्या मुलीचा लग्नाचा प्रस्ताव! काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 12:42 IST2025-09-26T12:38:14+5:302025-09-26T12:42:45+5:30
प्रसाद ओकला चित्रपटाच्या सेटवर चाहतीकडून आलेला लग्नाचा प्रस्ताव, पत्नी मंजिरीने सांगितला 'तो' किस्सा

"तिला तुमच्याशी लग्न करायचंय", बायकोसमोरच प्रसाद ओकला आलेला १९ वर्षांच्या मुलीचा लग्नाचा प्रस्ताव! काय घडलेलं?
Manjiri Oak : अनेक मराठी मालिका, चित्रपटांमधून अभिनेता प्रसाद ओक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनयासोबत प्रसाद ओकने दिग्दर्शन शैलीतूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. एक धोबी पछाड, फुल थ्री धमाल, धर्मवीर यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्याचा उत्कृष्ट अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळाला.या प्रवासात प्रसादला त्याच्या पत्नीची देखील कायम साथ मिळाली आहे. याबद्दल तो अनेकदा बोलत असतो. त्यात नुकतीच प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील तसेच सिनेप्रवासातील किस्से शेअर केले आहेत.
मंजिरी ओकने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने एका चित्रपटाच्या सेटवर घडलेला मजेदार किस्सा शेअर केला. त्याबद्दल बोलताना मंजिरी म्हणाली,"प्रसाद रत्नागिरीला शूट करत होता त्याचवेळी माझ्या धाकट्या लेकाचा तिसरा वाढदिवस होता. तर मग प्रसाद मला म्हणाला की,'तू त्याला घेऊन इकडेच ये.माझं दोन दिवसांत पॅकअप होईल आणि मग त्यानंतर आपण त्याचा वाढदिवस साजरा करु'.तेव्हा त्या चित्रपटाच्या सेटवर मी बसले होते आणि बाजूला शूटिंग चालू होतं. तेव्हा सोशल मिडिया नसल्यामुळे लोकांना फारशी नव्हती की मी त्याची बायको आहे किंवा त्याच्या कुटुंबाबद्दल लोकांना काहीच माहित नव्हतं."
त्यानंतर पुढे मंजिरीने म्हटलं,"त्याचदरम्यान एक बाई आल्या त्यांच्याबरोबर १९ वर्षांची एक मुलगी होती.तिथे माझ्याच बाजूला प्रसाद खुर्चीवर बसला होता. त्यावेळी प्रसादला ती बाई म्हणाली,'नमस्कार ही माझी मुलगी वगैरे... त्यांचं ते बोलणं ऐकून प्रसादला वाटलं की त्यांच्या मुलीला अभिनय करायचा आहे किंवा त्यासाठी काही मार्गदर्शन हवंय,असं असावं. तर ती बाई पटकन म्हणाली की हिला तु्मच्याशी लग्न करायचं आहे. त्यानंतर सेटवर एक-दोन मिनिटं सन्नाटा होता. तेव्हा प्रसादला माझी रिअॅक्शन काय असेल याची भीती नव्हती तर सेटवरच्या चार माणसांची भीती होती. कारण, हे जर बाहेर गेलं तर काय होईल, असं त्याला वाटत होतं."
नेमकं काय घडलेलं?
तर त्या बाईचं म्हणणं असं होतं की माझी मुलगी तुमची खूप मोठी चाहती आहे. तर तिला तुमच्याशी लग्न करायचं आहे. त्याचा आदर ठेवत प्रसादने माझं लग्न झालं आहे, असं स्पष्ट सांगितलं. तर त्यावर ती मुलगी म्हणाली,'ठीक आहे, मी अॅडजस्ट करेन'.तेव्हा त्या बाईला प्रसाद म्हणाला, अहो... माझं लग्न झालं आहे आणि माझी बायको तुमच्या समोर बसली आहे. तेव्हा ती बाई खूप घाणेरडे लूक देऊन तिथून निघून गेली. " असा मजेशीर किस्स मंजिरी ओकने शेअर केला.
दरम्यान, प्रसाद ओकच्या कामबद्दल बोलायचं झालं तर लवकरच 'वडापाव' या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'वडापाव' या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या भूमिका आहेत. येत्या २ ॲाक्टोबर रोजी प्रेक्षकांना या 'वडापाव'ची चव चाखता येणार आहे.