"गेली ४ वर्षे माझ्यासाठी खूप कठीण गेली, कारण...", लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदीला आले 'असे' अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:24 IST2026-01-02T12:23:07+5:302026-01-02T12:24:49+5:30
"गेली ४ वर्षे माझ्यासाठी खूप कठीण गेली...", लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदीने शेअर केले अनुभव, म्हणाली-"जे एकेकाळी सर्वस्व होतं..."

"गेली ४ वर्षे माझ्यासाठी खूप कठीण गेली, कारण...", लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदीला आले 'असे' अनुभव
Swanandi Berde: आपल्या विनोदी अभिनयाने सर्वांचंच मन जिंकणारा लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेची (Laxmikant Berde) आजही चाहते आठवण काढतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांचं मराठी सिनेसृष्टीत मोठं योगदान आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगा अभिनय बेर्डे इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आहे. तर लेक स्वानंदीने अभिनयाबरोबरच व्यवसाय क्षेत्रात देखील नशीब अजमावताना दिसते आहे. तिने वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. अशातच स्वानंदीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
सध्या सगळीकडे सगळीकडे नवीन वर्षांचा उत्साह पाहायला मिळतोय. सरत्या वर्षाला निरोप देत सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटी मंडळी देखील २०२५ मधील त्यांचे अनुभव तसेच चांगल्या वाईट आठवणी शेअर करताना दिसत आहेत. आता स्वानंदीने देखील २०२६ चं स्वागत करत एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटलंय,
"गेली ४ वर्षे माझ्यासाठी खूप कठीण गेली.मी कोणत्या परिस्थितीतून गेले याबद्दल फक्त माझ्या जवळच्याच लोकांना माहित आहे.पण जुलै ते डिसेंबर २०२५ पर्यंत आयुष्याने मला अशा प्रकारे बदललं ज्याची मी कधीच कल्पना केली नव्हती.आयुष्य बदलून गेलं आणि मी भरारी घेतली."
त्यानंतर स्वानंदी म्हणते, मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला,लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, नवीन मित्र बनवले, तर त्यातील काही गमावले जे एकेकाळी सर्वस्व होते. आता माझ्या जिवलग मित्रांना आयुष्यासाठी एकमेकांची निवड करताना आणि लग्न करताना पाहिलं.२०२५ ने मला आत्मविश्वास दिला आणि परिस्थिती बदलली तरीही पुढं जाण्याचं धाडस माझ्यात निर्माण केलं. २०२६ मध्ये पाऊल ठेवत आहे, येणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मी तयार आहे.माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्षाबद्दल आभारी आहे." अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.
सध्या सोशल मीडियावर सगळीकडे स्वानंदीची ही पोस्ट व्हायरल होत आहे. शिवाय या पोस्टवर तिचे चाहते कमेंट्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.