'बिल्कुल अपने बाप पे गया है'; गश्मीर महाजनीच्या लेकाचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 03:22 PM2022-05-16T15:22:48+5:302022-05-16T15:23:21+5:30

Gashmeer Mahajani गश्मीरने त्याच्या चिमुकल्या मुलाचा एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

marathi actor gashmeer mahajani son cute video viral | 'बिल्कुल अपने बाप पे गया है'; गश्मीर महाजनीच्या लेकाचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

'बिल्कुल अपने बाप पे गया है'; गश्मीर महाजनीच्या लेकाचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील हॅण्डसम हंक म्हणजे गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani). हिंदीसह अनेक मराठी चित्रपटांमध्ये झळकलेल्या गश्मीरने त्याचा मोर्चा सध्या  छोट्या पडद्याकडे वळवला आहे. त्यामुळे आता त्याच्या चाहत्यांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. त्यातच गश्मीरदेखील या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असतो. अनेकदा तो त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमधील काही क्षणही चाहत्यांसोबत शेअर करतो. यावेळी त्याने त्याच्या चिमुकल्या मुलाचा एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गश्मीरने अलिकडेच ट्विटरवर त्याच्या मुलासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने एक हटके कॅप्शन दिलं असून हा व्हिडीओ आणि त्याचं कॅप्शन नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

गश्मिर महाजनीनं ट्वीटरव त्याच्या मुलाचा एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानं व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, "बिलकुल अपने बाप पे गया है … हे जोक करत आहेत...पण मी खडूस नाही..(They are joking by the way, main Khadoos nahi hoon ).."असं कॅप्शन देत गश्मीरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये त्याचा लेक गश्मीरसोबत चालत असतो. यावेळी डान्स करणार का? असा प्रश्न गश्मीर त्याच्या लेकाला विचारतो. याचवेळी एक महिलादेखील तेथे येते आणि सेम प्रश्न ती या चिमुकल्याला विचारते. पण, हा लहानगा लगेचच 'नाही' असं उत्तर देतो.  त्याचं हे उत्तर ऐकल्यावर,"खडूस..बिल्कुल अपने बाप पे गया है..बिलकुलच फ्रेंडली नाही.. ", असं ही महिला म्हणते. त्यावर गश्मिर लगेच म्हणतो, 'अरे तो तसा नाही... तो खूप फ्रेंडली आहे.. '. त्यामुळे गश्मीरने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये  खडूस नाही असं म्हटलं आहे.

दरम्यान, गश्मीर हा प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेता रविंद्र महाजनी यांचा मुलगा आहे. गश्मीरने 'कॅरी ऑन मराठा', 'देऊळबंद', 'कान्हा', 'वन वे तिकिट', 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्याने 'मुस्कुराके देख जरा' व 'डोंगरी का राजा' या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. 

Web Title: marathi actor gashmeer mahajani son cute video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.