सावळ्या रंगामुळे मिळालं रिजेक्शन; मराठी अभिनेत्याला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना, म्हणाला-"मला संधी मिळाली नाही, कारण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 11:56 IST2026-04-08T11:55:17+5:302026-04-08T11:56:07+5:30
"काळा नायक नाही चालत सांगून नाकारलं", दुनियादारी फेम अभिनेत्याने सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू,म्हणाला...

सावळ्या रंगामुळे मिळालं रिजेक्शन; मराठी अभिनेत्याला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना, म्हणाला-"मला संधी मिळाली नाही, कारण..."
Marathi Actor Rajesh Bhosale: कलाकार म्हटलं की, संघर्ष हा आलाच. विशेषकरून जेव्हा ते त्यांच्या तत्वांनुसार काम करीत असतात.पण, प्रत्येकाचा संघर्ष हा वेगळा असतो.कलाकारांच्या बाबतीत ‘आज काम आहे, तर उद्या नाही’, असं अनेकदा होताना दिसतं. अनेक जण याबद्दल सांगतही असतात.अशातच नुकत्याच एका मुलाखतीत मराठीतील एका लोकप्रिय अभिनेत्याने त्याच्या संघर्षकाळाची माहिती दिली आहे.करिअरच्या सुरुवातीला या नायकाला इंडस्ट्रीत अनेकदा वर्णभेदाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, या अभिनेत्याचं नाव राजेश भोसले आहे.आजवर अनेकअनेक मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून काम करून या नायकाने रसिकांच्या मनावर गारुड घातलं. दुनियादारी चित्रपटात त्याने साकारलेली नित्याची भूमिकाही चांगलीच गाजली. अलिकडेच इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या संघर्षकाळातील दिवसांबद्दल भाष्य केलं.तेव्हा अभिनेता म्हणाला," मी 'शोभायात्रा' नावाचा सिनेमा जेव्हा केला, त्यावेळी मी मुख्य नायकाच्या भूमिकेसाठी प्रयत्न करत होतो. कारण त्यावेळेला थोडीशी बॉडी वगैरे माझी झाली होती. त्यावेळी थोडासा मी प्रयत्न केला होता. पण मला संधी मिळाली नाही. मग किती वर्ष वाट बघत बघायची?"
त्यानंतर पुढे अभिनेत्याने त्याच्या रिजेक्शनाचा किस्सा सांगताना म्हणाला, "नकार ऐकण्याबाबत बोलायचं झालं तर काही ठिकाणी नाटकांमध्ये आता नाव नाही सांगू शकत, पण त्यावेळेला असं म्हणाले की, नाटकात काळा नायक नाही चालत. असं मला सांगण्यात आलं होतं की, नाटकांत काळा हिरो नसतो ना. नाहीतर तू चांगलं काम करतोस."
तेव्हा नायक बनण्याची इच्छा पूर्ण करू लागलो...
या मुलाखतीत टीव्ही मालिकांमध्ये काम अनुभव सांगताना म्हणाला," सिनेमांत मी प्रयत्न केले पण त्यावेळी आता काही रोल नाही तुझ्यासाठी, असे तर नक्की सांगेन असं म्हटलं गेलं. त्यानंतर मग मी टीव्ही, सिरियलकडे वळलो. मग तिथे मी माझ्या नायक बनण्याची इच्छा पूर्ण करू लागलो. मला तिकडे तसे रोल मिळत गेले. मी ‘वेतोबा’ मालिका केली, ‘दुनियादारी’ केली, ‘अगं बाई सासूबाई’ केली, ‘विठूमाऊली’ केली, तिथे मला माझ्या मनासारखं काम करता आलं. माझी नोकरी नसल्याने आपलं फुल टाइम अभिनय क्षेत्रात असल्याने, आणि मालिका हे एक असं माध्यम आहे ज्यात एक चांगली रक्कम मिळते. महिन्यातील २०-२५ दिवस काम केल्याने एक चांगली रक्कम हातात येते. कालांतराने मी घर घेतलं. मी विरारमध्ये वन रूम किचनमध्ये राहत होतो, आज माझा विरारमध्ये टेरेस फ्लॅट आहे. आणि गोरेगांवला आई-वडिलांचं घर आहे. आणि आता मला मुंबईत यायचंय, मुंबईतील विलेपार्ले येथे स्वतःच घर घ्यायचं आहे हे माझं स्वप्न आहे". अशी इच्छा देखील अभिनेत्याने व्यक्त केली.