गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर भूषण प्रधानने आईवडिलांसाठी खरेदी केलं नवं घर, फोटोतून दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 15:01 IST2024-09-06T15:00:15+5:302024-09-06T15:01:09+5:30

भूषणने नवं घर खरेदी केलं आहे. भूषणने त्याच्या सोशल मीडियावरुन नवीन घराचे काही फोटो शेअर केले आहेत.

marathi actor bhushan pradhan buys new home in pune shared photos | गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर भूषण प्रधानने आईवडिलांसाठी खरेदी केलं नवं घर, फोटोतून दाखवली झलक

गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर भूषण प्रधानने आईवडिलांसाठी खरेदी केलं नवं घर, फोटोतून दाखवली झलक

अभिनेता भूषण प्रधान हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अभिनयाबरोबरच भूषणच्या फिटनेसचीही चर्चा होते. भूषण सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील माहितीही तो चाहत्यांना देत असतो. नुकतंच भूषणने नवं घर खरेदी केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भूषणने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. 

भूषणने त्याच्या सोशल मीडियावरुन नवीन घराचे काही फोटो शेअर केले आहेत. पुण्यात भूषणने हे नवीन घर खरेदी केलं आहे. आईवडिलांना भूषणने हे घर गिफ्ट म्हणून दिलं आहे. भूषणने घराचे फोटो शेअर करत पोस्टही लिहिली आहे. 

भूषण प्रधानने खरेदी केलं नवं घर

मागचे ६ महिने माझ्यासाठी खूप खास होते. जुनं फर्निचर आणि घरत गणपती या माझ्या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. जुनं फर्निचर सिनेमाने आपल्या आईवडिलांची आपण काळजी घेतली पाहिजे, याची आठवण करून दिली. घरत गणपती सिनेमाने एकत्र कुटुंबाची सुंदरता दाखवली. 

 

आता गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर मला माझं पूर्ण झालेलं स्वप्न शेअर करायचं आहे. माझ्या आईवडिलांसाठी मी नवीन घर खरेदी करू शकलो. हे घर म्हणजे त्यांचं माझ्यासाठी असलेलं प्रेम, आदर आणि त्यांनी कित्येक वर्षांपासून माझ्यासाठी केलेला त्याग आहे. 


भूषणच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. भूषणचा घरत गणपती सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला. या सिनेमात तो मुख्य भूमिकेत होता. 

Web Title: marathi actor bhushan pradhan buys new home in pune shared photos