'लोकांना वाटतं माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, पण...'; भरत जाधवने सांगितलं संपत्तीविषयीचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 09:30 AM2023-10-29T09:30:56+5:302023-10-29T09:32:15+5:30

Bharat jadhav: भरत जाधवने त्याच्या संपत्तीविषयी नुकताच खुलासा केला आहे.

marathi-actor-bharat-jadhav-shared-his-memories-with-marathi-natak | 'लोकांना वाटतं माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, पण...'; भरत जाधवने सांगितलं संपत्तीविषयीचं सत्य

'लोकांना वाटतं माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, पण...'; भरत जाधवने सांगितलं संपत्तीविषयीचं सत्य

आपल्या दर्जेदार अभिनयामुळे कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे भरत जाधव (bharat jadhav). नाटक, मालिका, एकांकिका आणि सिनेमा अशा प्रत्येक प्लॅटफॉर्मवर त्याचा वावर आहे. त्यामुळे आज त्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. याच कारणामुळे सोशल मीडियावर त्याच्याविषयी कायम नवनवीन चर्चा रंगत असतात. यात खासकरुन त्याच्या वैयक्तिक जीवनसोबतच त्याच्या कमाईविषयी जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक असतात. त्यामुळे भरत जाधवची कमाई किती, तो किती मानधन घेतो या गोष्टी वरचेवर रंगताना दिसतात. परंतु, 'लोकांना माझ्या प्रॉपर्टीविषयी गैरसमज आहे', असं म्हणत भरतने त्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी काही खुलासे केले आहेत.

भरत जाधवचं 'अस्तित्व' हे नवंकोरं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या नाटकाच्या निमित्ताने त्याने नुकतीच 'एबीपी माझा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी भाष्य केलं आहे.

काय म्हणाला भरत जाधव?

'खडा मारु तिथे भरत जाधवची प्रॉपर्टी आहे असं म्हटलं जातं', त्याविषयी काय सांगाल? असा प्रश्न भरतला विचारण्यात आला. त्यावर, "माझी एक सवय होती अगदी नाटकात येण्यापूर्वी पासून की एखादी जमीन किंवा गाडी पाहिल्यावर मस्त आहे ना. काय रेट काय आहे? असं विचारण्याची. बरं खिशात पैसे कुठेत. मी मराठी कलाकार आहे हो काय पैसे असणार खिशात. त्यामुळे माझी खूप प्रॉपर्टी आहे असा लोकांचा समज झालाय. पण, प्रत्यक्षात तसं काही नाहीये.  BMW असो वा पहिली व्हॅनिटी प्रत्येक नव्या गाडीचं स्टिअरिंग वडिलांच्या हाती दिलं आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यभर वडिलांनी टॅक्सी चालवली होती", असं भरत जाधव म्हणाला.

'तुमचं काम पाहिले, हे पैसे घ्या'; भरत जाधवला प्रेक्षकाने परत केले तिकीटाचे पैसे

दरम्यान, या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या फिल्मी करिअरविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. तसंच त्याच्या वडिलांनी घरासाठी केलेल्या स्ट्रगलवरही तो व्यक्त झाला. भरत जाधवने सिनेमा, मालिका गाजवण्यासोबतच रंगमंचही दणाणून सोडला आहे. 'सही रे सही', 'सौजन्याची ऐशी तैशी', 'ऑल द बेस्ट', 'श्रीमंत दामोदर पंत'  ही त्याची नाटकं तुफान गाजली आहेत.

Web Title: marathi-actor-bharat-jadhav-shared-his-memories-with-marathi-natak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.