संतोष जुवेकरने दिली गुडन्यूज! नवीन वर्षात अभिनेत्याने घेतली आलिशान गाडी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 09:45 IST2026-01-04T09:43:22+5:302026-01-04T09:45:57+5:30
संतोष जुवेकरच्या घरी आली नवी पाहुणी; अभिनेत्याने घेतली आलिशान गाडी, पाहा व्हिडीओ

संतोष जुवेकरने दिली गुडन्यूज! नवीन वर्षात अभिनेत्याने घेतली आलिशान गाडी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Santosh Juvekar Buy New Car: मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर.
त्याने मराठीसह हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. सध्या रंगभूमीवर त्याचं घाशीराम कोतवाल हे नाटक जोरदार सुरु आहे. त्यात आता हा अभिनेता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. संतोष सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असतो. संतोषने नुकत्याच शेअर केलेल्या एका खास व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अलिकडेच डिसेंबर महिन्यात संतोष जुवेकरने त्याच्या आईवडिलांसाठी Hyundai Aura गाडी खरेदी केली होती. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने आणखी एक गाडी खरेदी केली आहे. महिंद्राची थार रॉक्स ब्रॅंडची गाडी खरेदी करून संतोष जुवेकरने त्याचा हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मार्केटमध्ये या गाडीची किंमत १२.९९ लाख ते २३.०९ लाख रुपये इतकी आहे.
संतोष जुवेकरने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर नवी गाडी घेतल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'देखोना guysss देखोना! आईबाबा आणि साईबाबांच्या आशीर्वादाने आणि तुम्हां सर्वांच्या प्रेमा आणि शुभेच्छां मुळे नवीन वर्षातनवीन पेटीपॅक गाडी घेतली महाराजा आता प्रवासही नव्याने सुरु,चांगभलं...बाप्पा मोरया !' असं कॅप्शन या व्हिडीओ देत त्याने नव्या गाडीची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
दरम्यान, संतोषने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे."अभिनंदन संत्या भाई..." , "एकच नंबर...", अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी त्याच्या या व्हिडीओवर दिल्या आहेत.