मनवा नाईकचा पहिला मान्सून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 16:29 IST2016-06-30T10:59:55+5:302016-06-30T16:29:55+5:30

  Exclusive - बेनझीर जमादार मला मान्सून आवडतो, पण खिडकीजवळ बसून फक्त पाऊस पाहायला आवडतो. तसेच या थंड वातावरणात छानपैकी ...

Manwa Naik's first monsoon | मनवा नाईकचा पहिला मान्सून

मनवा नाईकचा पहिला मान्सून

ong>  Exclusive - बेनझीर जमादार

मला मान्सून आवडतो, पण खिडकीजवळ बसून फक्त पाऊस पाहायला आवडतो. तसेच या थंड वातावरणात छानपैकी झोप काढायला आवडते. आशा या पावसात सगळे फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करत असतात. मी मात्र सुट्टीच्या दिवशी मस्तपैकी झोप काढत असते. पण यंदाच्या मान्सूनला मित्र- मंडळानी माझे काही न ऐकता जबरदस्तीने लोणावळा येथे मान्सून एन्जॉय करायला नेले असल्याचे अभिनेत्री मनवा नाईक हिने लोकमत सीएनएक्सला सांगितले. मनवा म्हणाली, हा मान्सून मी पहिल्यांदा मित्र-मैत्रिणीमुळे मनसोक्त एन्जॉय केला. मोस्टली, मुंबईचा पाऊस हा धो-धो पडत असतो. पण लोणावळयाच्या या भुर्र-भुर्र पावसात भिजण्याचा आनंद एकदम वेगळा होता. त्यात मी कॉफी ड्रिंकर असून ही या अशा पावसात चहा पिण्याचा मोह मलादेखील आवरला नाही. तसेच पिठल- भाकर खाण्याची ही मजा लुटली. अशा प्रकारे मी माझा पहिला मान्सून एकदम झक्कासपणे एन्जॉय केला.

Web Title: Manwa Naik's first monsoon