मानसी नाईकचा 'जबरदस्त' प्रवास ! अभिनेत्रीला सिनेइंडस्ट्रीत झाले १४ वर्षे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 05:07 PM2021-06-09T17:07:11+5:302021-06-09T17:08:24+5:30

मानसीने जबरदस्त चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीतल्या कारकीर्दीला सुरूवात केली.

Mansi Naik's 'tremendous' journey! The actress has completed 14 years in Cineindustry | मानसी नाईकचा 'जबरदस्त' प्रवास ! अभिनेत्रीला सिनेइंडस्ट्रीत झाले १४ वर्षे पूर्ण

मानसी नाईकचा 'जबरदस्त' प्रवास ! अभिनेत्रीला सिनेइंडस्ट्रीत झाले १४ वर्षे पूर्ण

googlenewsNext

बघतोय रिक्षावाला म्हणत अभिनेत्री मानसी नाईक हिने आपल्या तालावर प्रेक्षकांना थिरकवले आहे. मानसीने जबरदस्त चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीतल्या कारकीर्दीला सुरूवात केली. नुकतेच तिला सिनेइंडस्ट्रीत १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

मानसी नाईक हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, मला नेहमीच माहित होते की मी प्रसिद्ध होणार. पण मला हेही माहित आहे की मजबूत झाडाप्रमाणे मूळ रोवून ठेवले पाहिजे. पहिली गोष्ट मी कलाकार होण्यासाठी बऱ्याच गोष्टी शिकले. तुमची क्रिएटिव्ही फॉलो करतो, याने काहीही फरक पडत नाही. मी पुरस्काराच्या मागे कधीच गेले नाही पण माझा फक्त पुरस्कारांवर विश्वास ठेवते. माझ्या मेहनतीवर मी किती चित्रपट साइन करते हे अवलंबून नाही. ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांची मी आभारी आहे. खरोखर मी कृतज्ञ आहे. अजून बऱ्याच गोष्टी येणार आहे. मी वचन देते. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायम असू दे. माझा प्रवास सुरू आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून १४ वर्षे झाली आणि जबरदस्त चित्रपटालाही १४ वर्षे झाली. 


मानसी नाईकच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. तिच्या या पोस्टवर तिची जवळची मैत्रीण दिपाली सय्यदने लिहिले की, अभिनंदन मनू. १४ वर्षांचा हा काळ म्हणजे १ तप पूर्ण केलेस. आता खरा राजयोग सुरू. खूप खूप मोठी हो. देव तुझे भले करो.

तसेच तिचा नवरा प्रदीप खरेराने अभिनंदन मेरी जान. तुझा मला खूप अभिमान वाटतो. मी नेहमीच तुझ्यासोबत आहे.

Web Title: Mansi Naik's 'tremendous' journey! The actress has completed 14 years in Cineindustry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.