मानसी नाईकने प्रदीप रावांसाठी घेतला हा उखाणा, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 15:50 IST2021-02-06T15:49:44+5:302021-02-06T15:50:32+5:30

मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे.

Mansi Naik took this riddle for Pradip Rao, shared the photo on social media | मानसी नाईकने प्रदीप रावांसाठी घेतला हा उखाणा, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

मानसी नाईकने प्रदीप रावांसाठी घेतला हा उखाणा, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे. लग्नानंतर ती प्रदीप खरेराच्या गावी फरीदाबादला गेली होती. नुकतेच ते दोघे मुंबईत परतले आहेत. दरम्यान आता मानसीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत उखाणा घेतला आहे.

मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे. त्यानंतर ती सोशल मीडियावर नवऱ्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच मानसीने फोटो शेअर करत उखाणा घेतला आहे. तिने फोटो शेअर करत म्हटले की, मंदिरात वाहते, फुल आणि पान प्रदीप रावांचे नांव घेते, ठेवून सर्वांचा मान.मानसी नाईकच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. 

मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात. प्रदीपच्या लूक्सवर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत.


मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत.

एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

Web Title: Mansi Naik took this riddle for Pradip Rao, shared the photo on social media