या मराठमोळ्या अभिनेत्रीवर मासे विकण्याची का आली वेळ?, जाणून घ्या या मागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 12:49 IST2020-01-02T12:48:13+5:302020-01-02T12:49:35+5:30

मराठमोळ्या या अभिनेत्रीनं आपल्या नृत्याने रसिकांना घायाळ केलं आहे.

Mansi Naik selling fish in Market, this is reason | या मराठमोळ्या अभिनेत्रीवर मासे विकण्याची का आली वेळ?, जाणून घ्या या मागचं कारण

या मराठमोळ्या अभिनेत्रीवर मासे विकण्याची का आली वेळ?, जाणून घ्या या मागचं कारण

मानसीनं आपली फॅशन स्टाईल जपली आहे. तसेच ती बऱ्याचदा तिच्या डान्स व फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. मात्र यावेळेस ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर मासोळी बाजारात मासे विकतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना ही मासे का विकतेय याचा प्रश्न पडला आहे. आम्ही तुम्हाला नेमकं तिच्यावर मासे विकण्याची वेळ आली, या मागचं कारण सांगतो.

मानसी नाईकने मासोळी बाजारात मासे विकतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने हातात मोठी सुरमई पकडली असून ती त्याच्याकडे पाहते आहे. तसेच या फोटोत ती एकदम साध्या लूकमध्ये असून साडी परिधान केली आहे. हा फोटो शेअर करून तिने म्हटलंय की, सनडे मार्केटला माझ्या मासोळीचा भाव रापचिक होणार आहे.


मानसीचा हा फोटो पाहून अनेकांना तिची चिंता वाटू लागली की ही का मासे विकते आहे. पण तिचा हा लूक तिच्या नव्या अल्बमसाठी आहे. तिचा नवीन व्हिडिओ अल्बम येणार आहे. ज्याची निर्मिती सागरिका म्युझिकनं केली आहे. हे गाणं कोळीगीत असून १२ जानेवारीला हा अल्बम रसिकांच्या भेटीला येणार आहे.

मानसीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मानसी नाईक ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून ती आपल्या डान्सचे जलवे दाखवते.

याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसी रसिकांची मनं जिंकली आहेत. 'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

मानसीचे 'बघतोय रिक्षावाला' या गाण्याप्रमाणेच 'बाई वाडयावर या'हे गाणे तुफान हिट ठरले.

मानसीच्या प्रत्येक गाण्याने तर पार्टी असो या लग्न हे गाणे धुमाकूळ घालताना पाहायला मिळते.

Web Title: Mansi Naik selling fish in Market, this is reason