एक अलबेलामध्ये मंगेश देसाईचे स्टंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 14:37 IST2016-06-17T08:58:34+5:302016-06-17T14:37:05+5:30

एक अलबेला या चित्रपटात भगवान दादाची भूमिका साकारणारे मंगशे देसाई यांनी  डान्सिंग सुपरस्टार आणि स्टंटमॅन असणारे भगवान दादा स्वत:मध्ये ...

Mangesh Desai's stunts in a box | एक अलबेलामध्ये मंगेश देसाईचे स्टंट

एक अलबेलामध्ये मंगेश देसाईचे स्टंट

अलबेला या चित्रपटात भगवान दादाची भूमिका साकारणारे मंगशे देसाई यांनी  डान्सिंग सुपरस्टार आणि स्टंटमॅन असणारे भगवान दादा स्वत:मध्ये  उतरवले आहे.  22 फूटांवरून उडी मारायची असो वा स्वॉर्ड फायटींगचे कसब दाखवणे, कोणत्याही बॉडी डबलशिवाय मंगेश देसाई यांनी स्वत: हे सगळे स्टंटस केले आहेत. या स्टंटस विषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना दिग्दर्शक शेखर सरतांडेल म्हणाले, स्वॉर्ड फायटिंगच्या सरावा दरम्यान डोळ्याला दुखापत होऊन ही शूटींग लांबणीवर न टाकता मंगेश ने ती पूर्ण केले असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. तसेच याच आठवणींना उजाळा देत मंगेश देसाई म्हणाले, माझ्या आयुष्य एक अलबेलाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच अ‍ॅक्शन सिक्वेन्सेस केले आहेत. हे आव्हान माझ्यासाठी फार कठीण होते. मी करू शकेन की नाही अशी शंका मनात होती, पण प्रत्येक अभिनेत्याला आव्हान स्वीकारावेच लागते. तसेच हे आव्हान  देखील मी स्वीकारले. 

Web Title: Mangesh Desai's stunts in a box