मानसी नाईकला कराचयं लगीन...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2017 08:53 AM2017-01-29T08:53:35+5:302017-01-29T14:23:35+5:30

 आपल्या नृत्याने अभिनेत्री मानसी नाईक हिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ही अभिनेत्री आता बॉलिवुडचा विनोदी बादशहा जॉनी लिव्हरसोबत ...

Manasi Naikkar karaijane hain ... | मानसी नाईकला कराचयं लगीन...

मानसी नाईकला कराचयं लगीन...

googlenewsNext
 
पल्या नृत्याने अभिनेत्री मानसी नाईक हिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ही अभिनेत्री आता बॉलिवुडचा विनोदी बादशहा जॉनी लिव्हरसोबत थिरकणार असल्याचे प्रेक्षकांसमोर आलेच आहे. तसेच या गाण्यात धडाकेबाज नृत्य करणारा सिध्देश पैदेखील असणार आहे. मला लगीन कराचयं आहे असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्याची कोरिओग्राफीदेखील सिध्देशनेच केली आहे. या गाण्याच्या बातमीमुळे मात्र या तिघांचा एकत्रित फोटो पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

        आता प्रेक्षकांची ही उत्सुकता संपली आहे. कारण नुकतेच मानसीने या गाण्यातील काही फोटो सोशलमीडियावर प्रदर्शित केली आहेत. तिच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर सिध्देश आणि मानसीचा हा डान्सचा धमाका आणि जॉनी लिव्हरचे ठुमके पाहाण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहे. म्हणूनच  मला लगीन कराचयं या गाण्यावर आता फुल कल्ला होणार असे वाटत आहे.

            या गाण्याचे चित्रिकरण सुरू असल्याचे कळत आहे. यामुळे तिच्या या गाण्याचीदेखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. सिध्देशची ही आयडिया असून त्यानेच हे गाणे दिग्दर्शन आणि कोरिओग्राफ केले आहे. तर संगीत स्वरूप भालवणकर यांनी दिले आहेत. . मानसीचे बाई वाडयावर या... या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. लग्न असो या पार्टी सवर् ठिकाणी हेच गाणे वाजताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या गाण्यानंतर मानसी नाईक ही मला लगीन कराचयं या गाण्यावर नृत्य करण्यास सज्ज झाली आहे. 







Web Title: Manasi Naikkar karaijane hain ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.