SEE PICS : 'बघतोय रिक्षावाला' फेम मानसी नाईकने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उरकला साखरपुडा

By रूपाली मुधोळकर | Published: November 11, 2020 10:18 AM2020-11-11T10:18:24+5:302020-11-11T10:20:09+5:30

या महिन्यात लग्न करणार मानसी आणि प्रदीप

Manasi Naik gets engaged to beau Pardeep Kharera | SEE PICS : 'बघतोय रिक्षावाला' फेम मानसी नाईकने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उरकला साखरपुडा

SEE PICS : 'बघतोय रिक्षावाला' फेम मानसी नाईकने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उरकला साखरपुडा

googlenewsNext
ठळक मुद्देमानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅॅॅॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून ती आपल्या डान्सचे जलवे दाखवते.

बघतोय रिक्षावाला आणि बाई वाड्यावर यासारख्या मराठी गाण्यांवर थिरकायला भाग पाडणारी अभिनेत्री मानसी नाईक अखेर एन्गेज्ड झाली. बायॅफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत तिने साखरपुडा उरकला. मानसीने सोशल मीडियावर ही आनंदीची बातमी शेअर केली.
‘Engaged Future Mrs. Kharera’ असे म्हणत साखरपुड्याचे काही फोटो मानसीने पोस्ट केले आहेत. आपल्या साखरपुड्याला मानसीने ऑरेंज-ग्रीन रंगाची साडी नेसली होती. तर प्रदीपने पायजामा व कुर्ता आणि त्यावर मानसीच्या साडीला मॅच करणारे जॅकेट घातले होते. 

कोरोनाचा धोका बघता, मानसी व प्रदीपने अतिशय साधेपणाने साखरपुडा उरकला. अगदी मोजक्या सहा लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी मानसीची अतिशय जवळची मैत्रिण व अभिनेत्री दीपाली सय्यद हजर होती. प्रदीपचे कुटुंबीय आणि नातेवाईकही या सोहळ्याला हजर नव्हते. ते हरियाणात राहत असल्यामुळे त्यांना या सोहळ्याला हजर राहता आले नाही. मात्र व्हिडीओ कॉलद्वारे ते सगळे या सोहळ्यात सहभागी झालेत. महाराष्ट्रीय पद्धतीचा साखरपुडा आणि रोका असे दोन्ही सोहळे यावेळी पार पडले.

मानसीने याबद्दल सांगितले की, आम्ही अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होतो. मात्र आता हे रिलेशनशिप पुढे नेण्याची योग्य वेळ आली होती. आम्ही दोघांनी साखरपुडा करावा, अशी आमच्या कुटुंबाची इच्छा होती. प्रदीपच्या वडिलांनीही साखरपुड्यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे आम्ही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकला. जानेवारी आमचा लग्न करण्याचा विचार आहे.

मानसीचा भावी पती हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता व मॉडेल आहे. प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात. प्रदीपच्या लूक्सवर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत. 

मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅॅॅॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून ती आपल्या डान्सचे जलवे दाखवते. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसी रसिकांची मनं जिंकली आहेत. एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 

ऐश्वर्या राय बच्चनची कार्बन कॉपी आहे ही मराठी अभिनेत्री, सोशल मीडियावर अशाप्रकारे होते ट्रेंड

Web Title: Manasi Naik gets engaged to beau Pardeep Kharera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.