Manasi Naik हटके अंदाजात थिरकली रश्मिका मंदानाच्या 'सामी सामी' गाण्यावर; व्हिडीओला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 19:17 IST2022-01-05T19:17:04+5:302022-01-05T19:17:44+5:30

मानसी नाईक (Manasi Naik) इंस्टाग्रामवरील व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

Manasi Naik dance on Rashmika Mandana's song 'Sami Sami'; Video is a favorite | Manasi Naik हटके अंदाजात थिरकली रश्मिका मंदानाच्या 'सामी सामी' गाण्यावर; व्हिडीओला मिळतेय पसंती

Manasi Naik हटके अंदाजात थिरकली रश्मिका मंदानाच्या 'सामी सामी' गाण्यावर; व्हिडीओला मिळतेय पसंती

आपल्या डान्स कौशल्य आणि सौंदर्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) सातत्याने चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे तेही सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे. मात्र यावेळी ती रश्मिका मंदाना (Rashmika Mandana)चा चित्रपट पुष्पा (Pushpa Movie)मधील सामी सामी (Sami Sami Song) गाण्यावर थिरकताना दिसते आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

मानसी नाईक हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती रश्मिका मंदानाच्या सामी सामी या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. तिने नववारी साडीत हटके अंदाजात या गाण्यावर डान्स केला आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, तू जरा सी, कम खूबसूरत होती, तो भी बहुत खूबसूरत होती..मानसी नाईकच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

मानसी नाईक मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीं आहे. 'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिचे 'बघतोय रिक्षावाला' या गाण्याप्रमाणेच 'बाई वाडयावर या' हे गाणे चांगलेच हिट ठरले.

Web Title: Manasi Naik dance on Rashmika Mandana's song 'Sami Sami'; Video is a favorite