प्रेम करायचंय पण लग्नाला विरोध! मृण्मयी देशपांडेच्या 'मना'चे श्लोक'चा हटके ट्रेलर, सिनेमा कधी होणार रिलीज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 11:49 IST2025-09-30T11:46:39+5:302025-09-30T11:49:45+5:30

मृण्मयी देशपांडेच्या आगामी 'मना'चे श्लोक' सिनेमाचा हटके ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामुळे सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे

manache shlok marathi movie trailer mrunmayee deshpande rahul pethe | प्रेम करायचंय पण लग्नाला विरोध! मृण्मयी देशपांडेच्या 'मना'चे श्लोक'चा हटके ट्रेलर, सिनेमा कधी होणार रिलीज?

प्रेम करायचंय पण लग्नाला विरोध! मृण्मयी देशपांडेच्या 'मना'चे श्लोक'चा हटके ट्रेलर, सिनेमा कधी होणार रिलीज?

टीझर आणि गाण्यांमुळे आधीच चर्चेत असलेला ‘मना’चे श्लोक’ आता ट्रेलरमुळे आणखीच रंगला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे यावेळी चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना अडीच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मृण्मयी देशपांडेचा दिग्दर्शक म्हणून नवीन सिनेमा असलेला  ‘मना’चे श्लोक’ सिनेमाचा ट्रेलर कसा आहे, जाणून घ्या

ट्रेलरमध्ये श्लोक-मनवाची केमिस्ट्री, त्यांच्या घरच्यांची मजेदार धावपळ आणि स्थळांच्या गंमतीजंमती ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. श्लोकच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली आहे, तर मनवासाठी तिचे कुटुंबही स्थळं पाहात आहे. या सगळ्या गडबडीत त्या दोघांच्या स्वप्नांचे काय होणार, ते दोघं एकत्र येतील का, लग्नासाठी तयार होतील का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. ट्रेलरमध्ये हसू, गोडवा आणि भावनिक क्षण एकत्र पाहायला मिळतात.

दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे म्हणतात, “हा फक्त श्लोक-मनवाचा प्रवास नाही तर त्यांच्या कुटुंबांचाही आहे. यात नाती, प्रेम, मैत्री आणि मजाही आहे. प्रेक्षकांना हे सगळं आपलं वाटेल आणि ते रंगून जातील.” प्रस्तुतकर्ता नितीन वैद्य म्हणतात, “ही आजच्या काळातील प्रेमकथा आहे, तरीही त्यात कुटुंबाची चौकटही आहे. ट्रेलरमुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि उत्तरं लवकरच चित्रपटात मिळतील.”

चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब अशी तरुणांची तगडी फळी आहे. तसेच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे ज्येष्ठ कलाकारही महत्वाच्या भूमिकेत दिसतील.

‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून याचे लेखन-दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले आहे. निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा असून, चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

Web Title : प्यार हाँ, शादी नहीं! मृण्मयी देशपांडे की 'मनाचे श्लोक' का ट्रेलर जारी।

Web Summary : मृण्मयी देशपांडे की 'मनाचे श्लोक' का ट्रेलर जारी हो गया है, जिसमें श्लोक और मनवा के परिवार के शादी के दबाव के बीच उनकी केमिस्ट्री दिखाई गई है। फिल्म हास्य, भावना का वादा करती है और पता लगाती है कि क्या वे एकजुट होंगे। 10 अक्टूबर को रिलीज हो रही है, इसमें एक शानदार कलाकार हैं, जो प्यार, परिवार और सपनों की खोज करते हैं।

Web Title : Love yes, marriage no! Mrunmayee Deshpande's 'Manaache Shlok' trailer out.

Web Summary : Mrunmayee Deshpande's 'Manaache Shlok' trailer is out, showcasing Shlok and Manva's chemistry amidst family pressures to marry. The film promises humor, emotion, and explores whether they'll unite. Releasing October 10th, it features a stellar cast, exploring love, family, and dreams.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.