मन माझे.... चिटरचे नवीन गाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 09:26 IST2016-04-26T03:56:06+5:302016-04-26T09:26:06+5:30

 हॅण्डसम अभिनेता वैभव तत्ववादी व सपंदर अभिनेत्री  पूजा सावंतवर हे गाणं मॉरिशियस येथील नयनरम्य लोकेशन्सवर शूट करण्यात आले आहे. 

Mana mera .... a new song of the song | मन माझे.... चिटरचे नवीन गाणं

मन माझे.... चिटरचे नवीन गाणं

भव तत्ववादी व पूजा सावंत या जोडीचा चिटर या चित्रपटाकडे सर्व प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. पण या चित्रपटाच्या सध्या प्रमोशन फंडा म्हणून हळूहळू करत एक एक गोष्ट बाहेर पडत आहे. असेच चिटर चित्रपटातील नुकतेच मन माझे... हे रोमॅण्टिक गाणे उलगडले आहे. हॅण्डसम अभिनेता वैभव तत्ववादी व सपंदर अभिनेत्री  पूजा सावंतवर हे गाणं मॉरिशियस येथील नयनरम्य लोकेशन्सवर शूट करण्यात आले आहे. अखिल जोशी यांनी या चित्रपटातील गाणी लिहिली असून अभिजित नार्वेकर यांचे संगीत लाभले आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि आनंदी जोशी यांच्या सुमधूर आवाजात हे गाणं स्वरबध्द करण्यात आले आहे. तर अजय फणसेकर दिग्दर्शित हा चित्रपट असून १३ मे रोजी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी प्रदर्शित होत आहे.


Web Title: Mana mera .... a new song of the song