छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्रीने केले खास फोटोशूट, फोटोंवर झाले सगळेच फिदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 19:47 IST2021-06-26T19:45:51+5:302021-06-26T19:47:24+5:30
या अभिनेत्रीने नुकतेच एक फोटोशूट केले असून या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्रीने केले खास फोटोशूट, फोटोंवर झाले सगळेच फिदा
माझा होशील ना... या मालिकेत गौतमी देशपांडे साकारत असलेली सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेमुळे तिला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग लाभले आहे. तिने नुकतेच एक फोटोशूट केले असून या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले असून याच फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
या फोटोत गौतमी भारतीय पेहरावात दिसत असून लाजून हासणे अन हासून ते पहाणे मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे असे कॅप्शन तिने दिले आहे. या फोटोत ती खूपच छान दिसतेय असे तिचे चाहते तिला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.
बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत गौतमीने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.