"मदर्स डेला आईवरचं प्रेम" महेश टिळेकरांनी मराठी इंडस्ट्रीतील कोणत्या अभिनेत्रीची केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:51 IST2025-07-16T15:48:50+5:302025-07-16T15:51:43+5:30

महेश यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीत इंडस्ट्रीतील काही कटू आणि धक्कादायक सत्यं उघड केली.

Mahesh Tilekar Slams Marathi Actress Over Hypocrisy On Mothers Day | "मदर्स डेला आईवरचं प्रेम" महेश टिळेकरांनी मराठी इंडस्ट्रीतील कोणत्या अभिनेत्रीची केली पोलखोल

"मदर्स डेला आईवरचं प्रेम" महेश टिळेकरांनी मराठी इंडस्ट्रीतील कोणत्या अभिनेत्रीची केली पोलखोल

Mahesh Tilekar Revealed Truth Of Marathi Film Industry: महेश टिळेकर (Mahesh Tilekar) हे मराठी सिनेइंडस्ट्रीतले मोठे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते सिनेइंडस्ट्रीत लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून सक्रिय आहेत. 'मराठी तारका' हा शो जगभरातील प्रेक्षकांपर्यंत त्यांनी पोहचवला. महेश यांनी आजवर अनेक कलाकारांसोबत काम केले.  महेश टिळेकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत  इंडस्ट्रीची काळी बाजू उघड केली. या मुलाखतीत त्यांनी अशा एका लोकप्रिय अभिनेत्रीचा उल्लेख केला की जी तिच्या आईलाच 'आई-बहिणीवरून' शिव्या घालते.

महेश यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कलाकारांच्या असभ्य वागणुकीवर भाष्य केलं.  नाव न घेता एका प्रसंग त्यांनी सांगितला. ते म्हणाले, "एक डिझायनर मुलगी लांबचा प्रवास करुन घरी पोहचते. तेव्हा तिच्यासमोर जेवलं जातं. पण, तिला पाणीही विचारलं जातं नाही. आपल्या घरात कुणीही आलं तर आपण विचरतोच. जेव्हा ती माझ्याकडे आली, तेव्हा ती मुलगी पावसात भिजून आली होती. तेव्हा माझी जेवायची वेळ झाली असल्यानं मी तिला जेवून जा असं म्हटलं. तर तिला एकदम भरुन आलं. ती रडायला लागली. तेव्हा तिनं तिचे मला अनुभव सांगितले".

पुढे ते म्हणाले, "गाड्या दाखवायच्या, मोठेपणाचं प्रदर्शन करायचं, पण तुमच्यासाठी राबणाऱ्यांशी माणुसकीने वागायचं नाही. हा नीचपणा आहे. मदर्स डेला आईवर किती प्रेम आहे, हे दाखवायचं आणि घरात स्वतःच्याच आईला आई-बहिणीवरून शिव्या द्यायच्या. हा किती नाटकीपणा आहे. मला वाटतं की त्यांनी कधीतरी स्व:ताला आरशात पाहावं. आपली आपल्या तरी लाज वाटली पाहिजे. आत एक बाहेर एक, अशी प्रतिमा बनवतात आणि लोक त्याला भुलतात", असं त्यांनी सांगितलं.

 

Web Title: Mahesh Tilekar Slams Marathi Actress Over Hypocrisy On Mothers Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.