महेश मांजरेकर इंडस्ट्रीत ग्रुपिझम करतात?; खणखणीत उत्तर देत म्हणाले- "हो, मी.."

By देवेंद्र जाधव | Updated: May 6, 2025 16:12 IST2025-05-06T16:10:52+5:302025-05-06T16:12:00+5:30

महेश मांजरेकर यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत ते इंडस्ट्रीत ग्रुपिझम करतात का? याविषयी खुलासा केलाय (mahesh manjrekar)

Mahesh Manjrekar does groupism in the marathi industry director revealed the answer | महेश मांजरेकर इंडस्ट्रीत ग्रुपिझम करतात?; खणखणीत उत्तर देत म्हणाले- "हो, मी.."

महेश मांजरेकर इंडस्ट्रीत ग्रुपिझम करतात?; खणखणीत उत्तर देत म्हणाले- "हो, मी.."

महेश मांजरेकर (mahesh manjrekar) हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. महेश मांजरेकरांना आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. याशिवाय महेश मांजरेकर यांनी वास्तव, काकस्पर्श, फक्त लढ म्हणा, अस्तित्व, विरुद्ध अशा सिनेमांचं दिग्दर्शनही केलंय. महेश मांजरेकर यांच्या सिनेमांमधून विविध मराठी कलाकार पुढे आले आणि इंडस्ट्रीत लोकप्रिय झाले. अशातच महेश मांजरेकर इंडस्ट्रीत ग्रुपिझम करतात का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, मांजरेकरांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

महेश मांजरेकर इंडस्ट्रीत ग्रुपिझम करतात?

महेश मांजरेकर इंडस्ट्रीत ग्रुपिझम करतात का? असा प्रश्न लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत विचारला असता ते म्हणाले की,  "हो, करतोच ना मी! त्यात लाजायचं काय.. मी वेगवेगळे चेहरे आधीपासून घेतले आहेत. ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं?" 

पुढे महेश मांजरेकर म्हणतात की, "मी पहिल्यापासून वेगवेगळे कलाकार घेतले आहेत. तुम्ही लिस्ट काढा आणि कोणाकोणाला घेतलंय बघा. मी त्या त्या भूमिकेला बरे वाटलेल्या सर्व कलाकारांना कास्ट केलंय. आणि मराठीच कलाकार घेतले आहेत. हिंदीमध्येही मी मराठीच कलाकार घ्यायचो."

"काही लोकांचं म्हणणं असेल की, सिद्धूला घेऊन मी मेनस्ट्रीम सिनेमा करावा. मला करायला आवडेल पण त्या सिनेमाला फायनान्स देणारा कोणीतरी हवा ना. हे अर्ध्या लोकांना कळत नाही. त्यांना वाटतं की, सिनेमाचा खर्च म्हणजे झाडावर असलेले चिचुके असतात. पण तसं नाही, त्यासाठी पैसा लागतो. माझ्या एका मराठी मुलाला घेऊन एक मोठा हिंदी पिक्चर करावा, हे मलाही आवडेल. पण मी ह्यांनाच घेतो आणि त्यांनाच घेतो, हे बोलायला काय जातं तुम्हाला. पैसे कोण देणार.  सिद्धू मला जगातला श्रेष्ठ नट वाटतो. पण हळूहळू बदलेल चित्र आणि मराठी कलाकाराला घेऊन एक हिंदी सिनेमा करता येईल."

Web Title: Mahesh Manjrekar does groupism in the marathi industry director revealed the answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.